Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

ॐ कार साधना २

ॐ कार साधना २

ओंकार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना – चिकित्सा पद्धती आहे.

ओंकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे.

ओंकार साधना याचा अर्थ ओमकाराच्या उच्चारातून, ओमकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ओंकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषत: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक ( अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ओंकार साधना अतिशय उपयुक्त आहे.

आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ओंकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओंकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो.

मन:शांती हा ओंकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ओंकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे. (पुढे सुरु….३) साभार: इंटरनेट

You cannot copy content of this page