Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

ॐ कार साधना –

ॐ कार साधना –

ॐ कार साधना – अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती…

व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. आरोग्य रक्षणासाठी असलेली अ‍ॅलोपॅथी ही आधुनिक चिकित्सा पद्धती ही एकच चिकित्सा पद्धती नाही, तर प्राचीन काळापासून भारतामध्ये विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती प्रचलित होत्या, त्यामध्ये आयुर्वेद, सिद्धऔषधी, योग, प्राणायाम, चुंबक चिकित्सा इ. अनेक प्रकारच्या पॅथी म्हणजेच पद्धती होत्या. त्यातील एक अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती म्हणजे ओंकार साधना !

तसं बघायला गेलं तर ती अष्टांग योगातील एक साधना पद्धती आहे आणि चिकित्सा पद्धती्ही आहे. खरंतर आजार का होतो? व्याधी कशी निर्माण होते? शरीरामध्ये दोष कसे निर्माण होतात? असंतुलन कसे तयार होते? शारीरिक आजार म्हणजे काय? मानसिक आजार म्हणजे काय? मनोकायिक आजार म्हणजे काय? या गोष्टींबाबत सर्वसामान्यांना खूप कमी माहिती असते.

मानवी शरीर म्हणजे फक्त बॉडी नावाचे यंत्र नसून त्याची रचना पंचकोषांनी बनलेली असते. त्यामध्ये शरीराबरोबर प्राण, मन, बुद्धी, आत्मा इ. तत्वे सुध्दा जोडलेली असतात. तसेच वैश्विक स्पंदने (ग्लोबल व्हायब्रेशन) आणि ब्रह्मांडीय ऊर्जा (कॉस्मिक एनर्जी) यांच्याबरोबरही ते जोडलेले असते. त्याचा परिणाम माणसाच्या मनावर, शरीरावर आणि एकंदरीत आरोग्यावर होत असतो. आधुनिक विज्ञान तर आत्ता म्हणते आहे की Vibrations is Life…! स्पंदने हेच जीवन आहे. सारे विश्व तरंगयुक्त आहे, स्पंदनमय आहे….स्पंदनानी भरलेले आहे. (पुढे सुरु….२) साभार: इंटरनेट

You cannot copy content of this page