Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

विषय – ©️

विषय – ‘वि’ म्हणजे काय? आणि ‘षय’ म्हणजे काय? 'वि' म्हणजे विश्वकर्ता. षय म्हणजे संशय रहित. न पाहता येणारे असे तत्व. वि याचा अर्थ विश्व आणि विला स्वर लावल्यानंतर ईश्वर ही संज्ञा ! षय म्हणजे सर्व संशयांचा क्षय करणारा ! जो विषय आहे तो अखंड आहे. त्याला कोणी तोडीत नाही. तोडू शकत नाही. कोणी तोडलेला…

Read More

सत्संग-३ ©️

सेवेकर्‍यांनी सत्संग मिळविण्याचा प्रयत्न करावा. साधू, पण साधू कोणता? ऋद्धी सिद्धी साधणारा साधू की सर्वांचे साधून आपलेही साधन करणारा साधू? की जो स्वयमेव आहे तो साधू? जो स्वयमेव साधू आहे, तो सर्व मानवांना, सेवेकर्‍यांना सहाय्य करून आपल्यात रममाण करणारा, एकच चाकोरी, एकच मार्ग दाखविणारा तो साधू होय. माझे-तुझे, मी-तू, काही नाही. सर्व एकच आहे असे…

Read More

सत्संग – २ ©️

या मुंबापुरीत आपले आसन आहे. तेव्हा या मुंबापुरीत सत किती आहे हे आपणास माहित आहे. त्यात किती अंतर आहे? सत्संग कोणाला मिळतो, तर त्या दरबारचे जे सेवेकरी आहेत, त्यांची संगती मिळवण्याचा सेवेकर्‍यांनी प्रयत्न केला पाहिजे. पूर्वीच्या संतांना एकमेकांचे सानिध्य एकमेकाला केव्हा मिळेल असे त्यांना वाटत होते. म्हणजे त्यांचे एकमेकां विषयी किती प्रेम होते, आदर…

Read More

सत्संग – १ ©️

सत्संग – सत् संगती कशी घडेल याची जर विवंचना केली, तर ती घडेल. पण हल्लीच्या काळात, सत्संग कुठे आहे आणि ती सत्संगती कशी मिळेल? भक्ती विषयी सांगावयास गेल्यास, प्रत्येकाला आपल्या भक्तीचा अभिमान वाटतो. मी करतो ते कोणालाही माहीत नाही, कोणाला करता येणार नाही. या दरबारातील काही सेवेकऱ्यांचे मत आहे, येथे जो अनुभव मिळतो,…

Read More

भक्ती कशी असावी? ©️

श्री समर्थ मालिक - भक्तीला वाद, तमाशा, डांगोरा हे काहीही लागत नाही. भक्ती ही आपोआप होणारी आणि जिव्हाळ्याची भक्ती आहे. भक्तीचा जिव्हाळा कशात आहे? हे ज्याने ओळखले, त्याला सांगण्याची जरुरी नाही. ज्याने ओळखले, याला पटले तो तिथून दूर जाणार नाही. अनेक अघोरांनी काही जरी सांगितले, तरी तो ऐकणार नाही. त्याला भक्तीपासून जरी दूर…

Read More

भक्ती हा राजमार्ग ©️

या दरबार मध्ये पूर्व संचिताप्रमाणे ज्योती घ्यावयाच्या त्याच घेतल्या जाणार ! इतरांना हा लाभ मिळणे दुरापास्त आहे. गीतेत विवेचन केले आहे, स्वयंभूने देखील सांगितले आहे. भक्तीला उपाधी, घट, मठ काहीही नको. हा राजमार्ग आहे. या मार्गाने सेवेकरी गेला, तरच त्या ठिकाणी तो जाईल. त्याला आडपडदे, दगड धोंडे, काटे कुटे काहीही नाहीत. अशा राज मार्गाने जो…

Read More

आंधळ्याची काठी ©️

हल्लीच्या काळात लोकांच्या मनाला वाटते, या जगात एक शक्ती आहे, पण ती शक्ती कशी पाहता येईल याची त्यांना गती नाही, म्हणून मानव भ्रमात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आंधळ्याला वाट दाखविणारा कोणी नाही. आंधळा काठीच्या मार्गदर्शनावर चालत असतो. मी त्याला वाट दाखवीत असतो. मानवांची ती काठी म्हणजेच सद्गुरु होय ! ही आंधळ्याची काठी आहे. मानव…

Read More

मग मी दुःखी राहीन का? ©️

सेवेकऱ्यांची भावना श्रेष्ठ आहे. कर्तव्यात जागृत आहेत. मान्य आहे. आपली प्रवचन ऐकण्याची उत्कृष्ट इच्छा आहे हे मी जाणतो. मनाची भावना अद्वैत कशी होईल? सद्गुरु आणि सेवेकरी वेगळे नाहीत हे केव्हा समजेल? सद्गुरु दर्शन कधी होईल? याची विवंचना केल्यानंतर कसलेही संकट येणार नाही. परंतु, सेवेकरी मायावी जाळ्यात गुरफटल्यानंतर काहीही करता येत नाही. मायावी जाळे…

Read More

श्रीराम नवमी – ३ ©️

ज्या ठिकाणी सेवेकर्‍याला वाघाचे व गायीचे दृश्य दाखविले, त्या ठिकाणी एक झरा आहे. १८ वनस्पतींचे मूळ त्या ठिकाणी आहे. तो झरा, ती नदी तिला गुप्तता कशी? तिचे पाणी कुठून आले? पण अघोरी राक्षसाने आश्रमाचा नाश केला. त्या ऋषीला परिवारासह गायब केले आणि या गुप्त नदीला पाताळात खेचले. परंतु जे १८ वनस्पतींचे मूळ त्या ठिकाणी पाण्याचे…

Read More

श्रीराम नवमी – २ ©️

मानव हा ईशाचा अवतार आहे. मानव योनीमध्येच अवताराची सुरुवात असते. त्याचा आढावा अगोदरच घडलेला असतो. आढाव्याची घडण अगोदर तयार असते आणि त्याप्रमाणे कृतिमान होत असेल, तरी त्याला सुखदुःखाचे तडाखे त्याप्रमाणे बसतात. त्याने एकच लक्षात ठेवणे, कशासाठी ही जीवन यात्रा आहे? त्याने सत् शुद्ध भावनेने सद्गुरु चरणी लिन होऊन, सुख दुःख हे संचिताचे खेळ आहेत, हे…

Read More

श्रीराम नवमी – १ ©️

श्री रामप्रभू - मानवांचा उद्धार करण्यासाठी, सताला तारण्यासाठी व असताचा नाश करण्यासाठी जी अवतार कार्य निर्माण केली गेलीत, त्यांचा हा शुभ दिन आहे. त्याप्रमाणे सर्वस्व अवतार कार्यांची कृती घडण घडविली. परंतु मानवांचे कोड कौतुक पुरविण्यासाठी ही गती प्रत्येक अवतार कार्यात घडवली आहे. प्रत्येक अवतार कार्यात सताला संरक्षण देणे व असताचा नाश करणे याची घडण…

Read More

ब्रह्म – श्री विठ्ठल ©️

पंढरपूर निवासी श्री विठ्ठल – ब्रह्म - ब्रह्म म्हटले म्हणजे त्या ठिकाणी सर्वस्व स्थिरावले जाते. हे उच्च कोटीचे स्थान होय. ज्याला स्थिती स्थापकत्व असते, त्या ठिकाणी सर्व लय होते. मिलन होते. सद्गुरु मिलन तेच ब्रह्म होय. मानवाचे कोड कौतुक पुरविण्यासाठी त्रिगुणात्मक आकार निर्माण होतो. त्यावेळेला अल्प बुद्धीप्रमाणे जवळ असते ते सांगणे होते. चित् सत…

Read More

You cannot copy content of this page