Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

दिनांचा दिनदयाळ ©️

दिनांचा दिनदयाळ ©️

श्री समर्थ मालिक – दिवा म्हणजे कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. त्याला तुम्ही शरण गेलात. त्यांनी तुम्हाला प्रकाश दिला आहे. तुम्ही स्वतः घेऊन आलेले नाहीत. तोच दिन, तोच दिवा प्रत्यक्ष घडण घडते ती पाहत आहे.

या दरबारात कोणी चोरी केली तर मी कणाकणात भरलेलो‌ आहे. केव्हाही सोडणार नाही. तो सुटणार नाही. असे काहींनी प्रत्यक्षात अनुभवले आहे. ज्यांनी अनुभवले नाही त्याना काही माहीत नाही. तेव्हा कोणाची कृपा आहे हे ओळखा !असे असताना सेवेकर्‍यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे. पण या ठिकाणी जे घडते ते कोणीतरी पाहते हे लक्षात ठेवा.

सेवेकरी बोलून जातो, घडण घडते. कोणीतरी घडवून घेत असते. त्यांचे कर्तव्य ते घडवून घेत आहेत. सेवेकरी हा नामानिराळा आहे. काही सेवेकरी प्रकाशमान आहेत. सानिध्यात गती घेत आहेत. गती घेत असताना, आसनाधीस्त अन माझे बोलणे चालत असताना मीच शहाणा म्हणून त्याची मान डोलत असते. असे झाले आहे, तोच सांगत आहे. ही घडण मीच घडवून घेतो. ओळखले आहे तर अनेकात तत्व एकच आहे. त्याही सेवेकऱ्यात मीच आहे अन् दुसऱ्यातही मीच आहे. असे जर वाटत असते तर त्यांने तसे केले नसते.

प्रथम चूक करावयाची आणि नंतर क्षमा मागवयाची. क्षमा करा, क्षमा करा. त्या क्षमेला अंतही नाही आणि पारही नाही. ज्या दिनाला शरण गेलात, त्याचे आदेश संदेश पाळणे हे सेवेकर्‍याचे कर्तव्य आहे. एक दोन अशा कितीतरी चुका आहेत. सर्वस्व क्षमेचाच पसारा मांडलेला आहे. म्हणजे तत्त्वात ते रममाण, लिन झालेत का? तत्व ओळखले आहे का? सर्वस्व मनाचा खेळ चाललेला आहे. सेवेकर्‍यांना प्रश्न करीत आहे – बरोबर आहे की नाही? मग ती ज्योत त्या दिनाला शरण आहे, त्यांच्या आदेशा शिवाय आत येऊ शकते का? अनेक सेवेकरी असे आहेत की त्या दिनाचा आदेश मानत नाहीत. ज्या वेळेला ते सांगतात, ते ऐकून घेतात. पण केव्हा? हे सांगता येत नाही. सेवेकर्‍यांनी आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page