Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

नाम म्हणजे भक्ती ©️

नाम म्हणजे भक्ती ©️

श्री समर्थ मालिक – मानव धर्म श्रेष्ठ आहे. या ठिकाणी नाम सर्वस्व आहे. सहज साधारण नाम म्हणजे भक्ती ! नाम कोणत्या तऱ्हेने झाले यावर लक्ष देणे. नामासारखी गोडी नाही. नामाशिवाय मनुष्य जन्माची गोडी लागत नाही. आपले जीवन कोणत्या तऱ्हेने जात आहे, हे फक्त अखंड नामाने लक्षात येते आणि म्हणूनच मुख्य नाम निर्माण झाले.

नाम मनुष्य जीवन तारण्यासाठी आहे. नाम ही वस्तु नाही, आकार, रूप, रंग काही नाही. आपण जसे पाहू तसे दाखविले जाते. ज्या इच्छेने घेऊ, ती इच्छा पुरी करते.

नाम हे बीजारोपण आहे. शुद्ध भूमी सात्विक झाल्यानंतर त्याच ठिकाणी असणारे नाम हे बीज आहे.

नाम हे अनेक तऱ्हेचे, अनेक मार्गात घेतले जाते. ज्यात मनुष्याचा उद्धार होतो, ते नाम सहसा लवकर मिळत नाही. नामाची गोडी लागल्यानंतर, ते सुटत नाही. असे ते नाम कोणते? त्याची गती काय? ते नाम कोठे आहे? याची ओळख आपणाला सद्गुरु करून देतात. ज्या ठिकाणी ते प्रगट झाले, ते चराचर, परात्पर, क्षरात्क्षर असे सर्वस्व व्यापून देखील अलिप्त आहे. (पुढे सुरु…२) ©️

You cannot copy content of this page