Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

ॐ कार ध्वनी फेकणारे आपण…©️

ॐ कार ध्वनी फेकणारे आपण…©️

बाबा – सर्वस्व सृष्टीची रचना करणारे आपण, ॐ कार ध्वनी फेकणारे आपण अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे आपण !

मालिक – आपण म्हणता हे खरे आहे. पण वाईट वाटते एकच की, सेवेकर्‍यांनी हे घेतले नाही. जर हे घेतले असते तर हे शहर दुमदुमून सोडले असते. सेवेकर्‍यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना ही संपत्ती त्यांनी का लुटू नये? भंडार का लुटू नये? मग याची गोडी सेवेकर्‍यांना का असू नये? जर आहे मग लुटण्याची मनाई केली आहे का?

बाबा – सेवेकरी लुटायला जातात पण तुम्हीच लुटू देत नाहीत. त्यांना तळमळ आहे. खजिना जवळच आहे पण तुम्ही पोहचू देत नाहीत.

मालिक – पण शंका रहित सेवेकरी झाला की त्या खजिन्याला त्याने हात घातलाच समजा. थोडीशी मनाला शंका आली की, मायेचा पगडा बसलाच !

बाबा – शंका का येते? तर मन चंचल होते.

मालिक – त्यात माझा काय दोष? महामायेला थोडी संधी मिळाली की सेवेकरी गयावया करतो. कारण नटलेले जे आहे ते मायावीने नटलेले आहे अन् म्हणून माया कोणालाही माझ्यापर्यंत येऊ देत नाही. ज्याने तत्वाची ओळख करून घेतली, जे ठाम राहिले तेच या ठिकाणी येऊ शकतात. ही बया आहे. ती म्हणते मीच सर्वस्व ! तिला अधिकार दिलेले आहेत म्हणून सेवेकरी फसतो. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page