Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री विठ्ठल आणि बाबा – संवाद ©️

श्री विठ्ठल आणि बाबा – संवाद ©️

“मन हे मज पासोनी जाण |” मग मन आळवले असा योगी कोण? हे जरी मजपासून असले तरी प्रत्येकाची प्रकृती त्याच्या स्वाधीन आहे का? आणि म्हणूनच मनाची ठेवण ज्या तऱ्हेने, त्या तऱ्हेने चाचपणी असते. प्रकृती शुद्ध नाही मग मन गढूळ होणारच ! प्रकृतीच्या तरंगामुळे मन चल बिचल होते. भूमी शुद्ध झाल्यानंतर कृतीमान असले पाहिजे. अन् हे जर टिकविले, मग प्रश्नच नाही. मग, मन गढूळ होईल का?

बाबा – मन गढूळ होते कारण हा संसार आहे ना?

विठ्ठल – एका भक्ताने म्हटलेले आहे, “दिल गया तो जाना दे | मत जाना दे शरीर || ना खेचेगा कमान | तो कहा से लगेगा तीर || त्याचे शेले मी विणले ते का? चोखोबा संगे ढोरे ओढली, जनाची लुगडी धुतली याची कारणे कोणती? मग आताच्या सेवेकऱ्यांची कामे करायला जड पडतील काय?

संशय कल्पना यामुळे त्यांना शंका येते. जोपर्यंत सेवेकरी संशय, कल्पना रहित होत नाही, तोपर्यंत भक्तीत रममाण होणे शक्य नाही.

सद्गुरुनी अखंड ठेव दिली. सर्वस्व दिले? पण शंका ती आली की, मग मन गढूळ झाले. मग सद्गुरूं पेक्षा आणखी कोणी एक तत्व जगात आहे कां? तर नाही. मन सद्गुरु चरणात निमग्न करण्याचा प्रयत्न करा. तदनंतर आकारी आणि निराकारी कळेल. सद्गुरु चरणात निमग्न झाल्यानंतर मग एकादशी याचा अर्थ कळणार नाही का?

दहा इंद्रिये मनाच्या ठिकाणी लय करणे अन् ते मन सद्गुरू चरणावर वाहिल्यानंतर मग अकरावे ठिकाण वेगळे आहे का? हे सर्वस्व बहाल केल्यानंतर त्रिकुटी स्थिर होते. तिथून मन अकराव्यात लय होते. हीच एकादशी, मग एकादशीचा अर्थ कळेल की नाही?

बाबा – १० + १ = ११. त्या एकाचाच अंत घेणे. त्याच्यानंतर एकादशी म्हणजे १० + ० + १. शून्य म्हणजेच ओंकार !

विठ्ठल – या सेवेकऱ्यांना आसनावरून गणित रूपाने सांगितले. मग कृतिमान होण्याचा प्रयत्न सेवेकर्‍यांनी करणे. १ म्हणजेच आकार ! तोच ॐ कार ! म्हणजे एकातच एक मिलन झाल्यानंतर मग सर्व एकच ! शेवटी तो ही एक लय होतो. मग निर्गुण निराकार ! त्यांनी अनंत तत्वे या पृथ्वीतलावर फेकली आहेत. त्यांच्याकडून ते कार्य करून घेतात. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने आपले कर्तव्य काय? आपण कोण? कोणत्या ठिकाणी शरण आहोत? हे ओळखून कृतीमान होण्याचा प्रयत्न करणे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page