Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

नाम म्हणजे भक्ती ४ ©️

नाम म्हणजे भक्ती ४ ©️

सद्गुरु कसे आहेत? सद्गुरु तारक आहेत. सद्गुरु तारक या पदापासून सर्वस्वाचा उद्धार ! सद्गुरु कसे आहेत, कोणत्या तऱ्हेचे आहेत याची ते ओळख करून देतात.

सद्गुरु नाम देवून आकारी प्रसवले आहेत.

आसन कोणत्या तऱ्हेचे आहे? स्थूल सूक्ष्म की इतर कोणत्या तऱ्हेचे आहे हे दाखवू शकत नाही, म्हणून ते फक्त सिंहासन करून दाखविले जाते.

सेवेकर्‍यांनी सद्गुरु चरणांची ओळख करुन घेणे ही प्रथम पायरी आहे. हे सर्व कळण्याला नामच कारण आहे. त्या नामाशिवाय गती नाही.

सद्गुरु हे सर्वात म्हणजेच माया, ममता, प्रेम यामध्ये एकत्र झालेले असतात. सत आणि शांती होण्यास नामच कारण आहे. नाम हे ज्यावेळेला शिष्याचा योग असतो, ज्यावेळी त्याची कृती ओघाने येते, त्यावेळी आणि सर्वस्व शुध्दी झाल्यानंतर मिळते. तिच स्थिती सेवेकऱ्याने शेवटपर्यंत टिकवली म्हणजे तो सत् शिष्य झाला.

आपण सेवेकरी सगळे सेवेकरीच आहोत. मनुष्य जीवन कशावर अवलंबून आहे? ते आर्थिक बळावरच तेजस्वी आहे अशी समजूत असून, सत भक्ती या तत्त्वात कोणी शिरत नाही.

जी भक्ती सत युगात होती, तिच भक्ती कलियुगात देखील आहे. मनुष्य कृती संशयाची असल्यामुळे सत् भक्तीचा विसर पडतो. सत भक्ती, सत पदाने जावयास पाहिजे. सद्भक्तीत कोणाचा टेकू आहे हे लक्षात घ्यावयास पाहिजे. सत् भक्ती कोठे लीन होते? तर ती सद्गुरु चरणात लिन होते. (पुढे सुरु…५) ©️

You cannot copy content of this page