Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

मान अपमान सोडा ©️

मान अपमान सोडा ©️

श्री समर्थ मालिक – मन म्हणजे माया. माया म्हणजे प्रकृती. ते बोल ओळखायला मिळतात. मग सेवेकरी अभिन्न का होत नाही? हेवेदावे, गटबाजी काय आहे हे? जीवाच्या जिवलगाप्रमाणे ह्यांचे एकमेकांशी वर्तन का असू नये? ज्या ठिकाणी मान अपमान आला, तो सेवेकरी सतात रममाण झाला नाही. त्यांने सताचे बोल ऐकले नाहीत. मान अपमानाला जखडला की हेवेदावे निर्माण होतात. सत् बाजूला असते. ते हे पाहत असतात. यामुळेच म्हणतात, सेवेकरी सतात रममाण झाला नाही.

जो सतात रममाण झाला, तो मायेचे बोल ओळखून गप्प बसतो. कारण मायेच्या बोलाला तो महत्त्व देत नाही. तो सताचे बोल ऐकण्यासाठी अधीर झालेला असतो. तो मान अपमान हे बघत नाही. तो मायेला जखडून राहत नाही. मनाच्या तरंगाने चालत नाही. म्हणून तो सेवेकरी सुखदुःखाच्या वेगळा असतो. पण असा जो सेवेकरी आहे त्याची मानव विटंबना करतात. तरी तो सेवेकरी कोणाकडेही पापणी वर करुन पहात नाही. संदेशांचे महत्त्व त्याला कळते. त्याप्रमाणे तो वाटचाल करतो. तो सेवेकरी मान अपमानाला जखडला आहे असे म्हणता येईल का? तर नाही. तो सेवेकरी सद्गुरु ध्यानात निमग्न झाला आहे नाही का? आताचे सेवेकरी सांगतात, प्रकृतीचे बोल ओळखतात. पण त्यांना मनाला थोडेसे सुद्धा बाजूला हटविता येत नाही. अभिन्न बनता येत नाही. असे का? (©️)

You cannot copy content of this page