Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

नाम म्हणजे भक्ती २©️

नाम म्हणजे भक्ती २©️

श्री गुरुदेव पितामह म्हणतात, “ॐ या प्रणवातच सर्वस्व स्थिती बहरलेली आहे.“

सताने दिधलेले प्रणव मानवाच्या लक्षात रहात नाहीत. आकलन येणे सताने आपणांस आपणाप्रत घेऊन ठेवले आहे. जर सताने तुम्हास आपणाप्रत घेऊन ठेवले नसते, तर तुम्ही स्थिर राहू शकणार नाही. सताने आपली जी स्थिती आहे, ती आपणाप्रत ठेवली आहे. ज्या अवधीत सताने आपल्या शिरकमलावर हस्तस्पर्श केला, त्या अवधीत सताने तुम्हास आपणाप्रत घेतले आहे.

*ॐ स्थितीवर प्रणवावरच सर्वस्व स्थिती बहरलेली आहे.*

शारीरीक स्थितीत जी इंद्रिय स्थिती आहे, त्यामध्ये आद्य इंद्रिय – तुमचे शिरकमल आहे. तुम्हास शिरकमल नसेल तर इतरत्र शारीरीक स्थितीचा तुम्हास काही उपयोग नाही. त्या शिरकमलातच सर्वस्व बहरलेले आहे. आपणास शिरकमल नसेल तर तुमचे हात काही करु शकणार नाहीत, पाय काही करु शकणार नाहीत, हृदय काही करु शकणार नाही. शिरकमल असते तेंव्हाच सर्वस्व स्थिती कर्तव्य करु शकते.

त्या शिरकमलात ॐ प्रवेश करुन आहे म्हणून आपण आहात. आपुले मुख आहे, डोळे आहेत, कान आहेत अन् लक्षात रहाण्यासाठी मेंदू आहे. हा मेंदूच तुमच्या सर्वस्व शरीराला चालना देत असतो. परंतु निर्गुण निराकार आपणास आकार देते, ते जर तुमच्यात प्रवेश करुन नसेल तर तुम्ही कर्तव्य करु शकणार नाही. ॐ कारांची स्थिती तुमच्यात राहील तरच सर्वस्व स्थिती तुमच्या स्थितीत राहील अन् त्याचवेळी तु़म्ही कर्तव्य करु शकणार. ॐ कारांची स्थिती सताने कर्तव्यासाठीच केली आहे. (पुढे सुरु…३) ©️

You cannot copy content of this page