Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

आषाढी एकादशी (एकचित्त) ©️

आषाढी एकादशी (एकचित्त) ©️

श्री विठ्ठल – आषाढी एकादशी – दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वाजवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी?

जे सत् तत्व आहे ते भक्ताला कधी सानिध्यात घेतील ते त्यांच्यावर अवलंबून आहे. मीच सर्वस्वाचे निधान आहे असे नाही. एकमेक एकमेकावर अवलंबून आहेत. आपण प्रत्यक्ष आहात. मी अदृष्य आहे. प्रत्यक्ष स्थूल देही व्यवहार या ठिकाणी आहे. लाखावर यात्रा जरी भरली तरी मला कोणी पाहिले नाही. पाहणारे भक्त गेले. आता या काळात कोणीही नाही. हौसे, नवसे, गवसे हे त्या ठिकाणी गेले आहेत. सत् भक्त म्हणून नाही. आपल्या आदेशा प्रमाणे त्या ठिकाणचे परिवर्तन चालले आहे.

मालिक कोणास म्हणावे हे सुद्धा मला कळेनासे झाले आहे. आत्ताचा काळ तसा नाही. भाविक भक्त म्हणावे तर ती ज्योत भक्तीतच रममाण झाली पाहिजे. भक्तीत रममाण झाली, तर एवढ्या लांब येण्याची आवश्यकता काय? सेवेकरी देऊन देऊन काय देणार आहे मला? कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का?

कोणीही भक्त बिलकुल मागणी न करता परतला आहे का? मग हे भक्त आहेत असे म्हणता येईल का? जे मागायचे ते मागत नाहीत. म्हणून मला त्यांना लवकर दर्शन द्यावे असे वाटत नाही. एकही भक्त सत् भक्तीत रममाण नाही. जर रममाण झाला असता तर मला गाठ घेण्याची आवश्यकता वाटली असती. आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे. मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन केले आहे. आदेश देणारे, कार्य करून घेणारे कोणी तरी आहेत. पण ती खूण दाखविणारे आकारी असले पाहिजेत. मग मी आकारी आहे का? ©️

You cannot copy content of this page