श्री समर्थ मालिक - जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, वर्म जाणतो त्याला ठाव लागतो. तोच अंत घेतो. अंत घेतला तरी बांधून ठेवत नाही. ठेवता येत नाही. त्या पात्रतेचा सेवेकरी असला पाहिजे. त्यांच्यात पूर्ण रममाण, एकचित्त झाला पाहिजे. मग त्याला काहीच सांगता येणार नाही आणि अशांचे सेवेकरी कोण? अशांचे सेवेकरी आपण असताना सुद्धा काहींच्या मनात शंका निर्माण…
प्रार्थना – प्रा म्हणजे काय? प म्हणजे काय? ना म्हणजे काय? प्रार म्हणजे काय? आणि थ म्हणजे काय? न म्हणजे काय? म्हणजेच परात्पर, चराचर, क्षराक्षर असे ते परात्पर तत्व !
परात्पर तत्व ! ते कोणी निर्माण केलेले नाही. घडविलेले नाही. घडविणारा नाही. असे तत्व त्याला प्रार्थ असे म्हटले आहे. प्रार्थना म्हणजे ज्याचा अर्थ…
मायेत, संसारात लपेटल्यानंतर, ब्रह्म आधी का माया आधी? ब्रह्माच्या मागे लागल्यानंतर माया पाठीशी येईल. म्हणूनच सत भक्ती हीच अद्वैत भक्ती आहे. अद्वैत भक्तीने जाईल, त्याला सर्व ठिकाणी एकच दिसेल. सताची गती घेतल्यानंतर ते जगभर कसे वावरते ते समजेल. सद्गुरु सर्व ठिकाणी फिरवित असतात.
आपण आपल्या सद्गुरु चरणात निमग्न होऊन पुढे पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न…
मानव षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटलेला असतो. अहंकाराने क्रोधाने बरबटलेला असतो. त्याचा क्षय करणारे असे तत्त्व ! त्यालाच म्हटलेले आहे विषय !
याचा क्षय कोण करतो? तर ईश्वर ! सेवेकरी करेल का? सेवेकर्याच्या ठिकाणी लिनता, नम्रता, शांती हा त्रिवेणी संगम असेल तर क्षय करायला वेळ नाही. सेवेकरी सद्गुरु आदेशाप्रमाणे वागत असेल तर क्षय करण्यास वेळ नाही. द्वैत…
विषय – ‘वि’ म्हणजे काय? आणि ‘षय’ म्हणजे काय? 'वि' म्हणजे विश्वकर्ता. षय म्हणजे संशय रहित. न पाहता येणारे असे तत्व. वि याचा अर्थ विश्व आणि विला स्वर लावल्यानंतर ईश्वर ही संज्ञा ! षय म्हणजे सर्व संशयांचा क्षय करणारा !
जो विषय आहे तो अखंड आहे. त्याला कोणी तोडीत नाही. तोडू शकत नाही. कोणी तोडलेला…
सेवेकर्यांनी सत्संग मिळविण्याचा प्रयत्न करावा. साधू, पण साधू कोणता? ऋद्धी सिद्धी साधणारा साधू की सर्वांचे साधून आपलेही साधन करणारा साधू? की जो स्वयमेव आहे तो साधू? जो स्वयमेव साधू आहे, तो सर्व मानवांना, सेवेकर्यांना सहाय्य करून आपल्यात रममाण करणारा, एकच चाकोरी, एकच मार्ग दाखविणारा तो साधू होय. माझे-तुझे, मी-तू, काही नाही. सर्व एकच आहे असे…
या मुंबापुरीत आपले आसन आहे. तेव्हा या मुंबापुरीत सत किती आहे हे आपणास माहित आहे. त्यात किती अंतर आहे? सत्संग कोणाला मिळतो, तर त्या दरबारचे जे सेवेकरी आहेत, त्यांची संगती मिळवण्याचा सेवेकर्यांनी प्रयत्न केला पाहिजे.
पूर्वीच्या संतांना एकमेकांचे सानिध्य एकमेकाला केव्हा मिळेल असे त्यांना वाटत होते. म्हणजे त्यांचे एकमेकां विषयी किती प्रेम होते, आदर…
सत्संग – सत् संगती कशी घडेल याची जर विवंचना केली, तर ती घडेल. पण हल्लीच्या काळात, सत्संग कुठे आहे आणि ती सत्संगती कशी मिळेल?
भक्ती विषयी सांगावयास गेल्यास, प्रत्येकाला आपल्या भक्तीचा अभिमान वाटतो. मी करतो ते कोणालाही माहीत नाही, कोणाला करता येणार नाही.
या दरबारातील काही सेवेकऱ्यांचे मत आहे, येथे जो अनुभव मिळतो,…
श्री समर्थ मालिक - भक्तीला वाद, तमाशा, डांगोरा हे काहीही लागत नाही. भक्ती ही आपोआप होणारी आणि जिव्हाळ्याची भक्ती आहे. भक्तीचा जिव्हाळा कशात आहे? हे ज्याने ओळखले, त्याला सांगण्याची जरुरी नाही. ज्याने ओळखले, याला पटले तो तिथून दूर जाणार नाही. अनेक अघोरांनी काही जरी सांगितले, तरी तो ऐकणार नाही. त्याला भक्तीपासून जरी दूर…
या दरबार मध्ये पूर्व संचिताप्रमाणे ज्योती घ्यावयाच्या त्याच घेतल्या जाणार ! इतरांना हा लाभ मिळणे दुरापास्त आहे. गीतेत विवेचन केले आहे, स्वयंभूने देखील सांगितले आहे. भक्तीला उपाधी, घट, मठ काहीही नको. हा राजमार्ग आहे. या मार्गाने सेवेकरी गेला, तरच त्या ठिकाणी तो जाईल. त्याला आडपडदे, दगड धोंडे, काटे कुटे काहीही नाहीत. अशा राज मार्गाने जो…
हल्लीच्या काळात लोकांच्या मनाला वाटते, या जगात एक शक्ती आहे, पण ती शक्ती कशी पाहता येईल याची त्यांना गती नाही, म्हणून मानव भ्रमात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आंधळ्याला वाट दाखविणारा कोणी नाही. आंधळा काठीच्या मार्गदर्शनावर चालत असतो. मी त्याला वाट दाखवीत असतो. मानवांची ती काठी म्हणजेच सद्गुरु होय !
ही आंधळ्याची काठी आहे. मानव…
सेवेकऱ्यांची भावना श्रेष्ठ आहे. कर्तव्यात जागृत आहेत. मान्य आहे. आपली प्रवचन ऐकण्याची उत्कृष्ट इच्छा आहे हे मी जाणतो.
मनाची भावना अद्वैत कशी होईल? सद्गुरु आणि सेवेकरी वेगळे नाहीत हे केव्हा समजेल? सद्गुरु दर्शन कधी होईल? याची विवंचना केल्यानंतर कसलेही संकट येणार नाही. परंतु, सेवेकरी मायावी जाळ्यात गुरफटल्यानंतर काहीही करता येत नाही.
मायावी जाळे…