Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

प्रार्थना (२) ©️

प्रार्थना (२) ©️

श्री समर्थ मालिक – जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, वर्म जाणतो त्याला ठाव लागतो. तोच अंत घेतो. अंत घेतला तरी बांधून ठेवत नाही. ठेवता येत नाही. त्या पात्रतेचा सेवेकरी असला पाहिजे. त्यांच्यात पूर्ण रममाण, एकचित्त झाला पाहिजे. मग त्याला काहीच सांगता येणार नाही आणि अशांचे सेवेकरी कोण? अशांचे सेवेकरी आपण असताना सुद्धा काहींच्या मनात शंका निर्माण होते ती का? का निर्माण होते?

अशा महान तत्वाचा अर्थ लावता येत नाही, वर्णन करता येत नाही, दृष्टी थांबत नाही. मात्र गती मिळते. ती पण थोडीशी जागृकता ठेवली तरच गती मिळते. जाणीव रहित सेवेकरी झाला तर तो काय सांगणार आहे? मग असा सेवेकरी त्या ठिकाणी रममाण झाला तर तो कोणाची टिंगल करील का? शंका घेईल का? जर तो अखंड चरणात रममाण झाला, तर त्याची शंका दूर होईल की नाही?

मला असे म्हणावयाचे, नामस्मरण होत नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी रममाण होत नाही म्हणून शंका घेतात. मात्र सेवेकरी संशय रहित, शंका रहित होईल, मग मात्र तो बरोबर वाटचाल करू शकेल. वाटेला लागू शकेल. पण आता हे झाले, मग काय होईल? अशी शंका निर्माण होते की नाही? मला जी गती मिळते, दिसत आहे की नाही? सांगू की नको असे वाटते ना?

पूर्वीच्या पेक्षा उच्च पातळीची गती घेतली तर सत्य काय आहे हे सापडू शकेल. आपण शंका नाहीशी झाल्यानंतर, दुसऱ्या ठिकाणी शांती आहे की अशांती आहे याची गती बरोबर मिळेल. आपणच अशांत असलो तर गती बरोबर मिळेल का? मग प्रार्थना याचा अर्थ काय? म्हणूनच अशा सद्गुरु तत्त्वाचे वर्णन करता येत नाही. समर्थ चरणांवर प्रार्थना ही अक्षरे आहेत. म्हणून त्यांची गती घेतल्यानंतर त्यांनी विवेचन केले. पण इतकेच, मानवांना याची गती घेता येत नाही. गती घेतली तरी त्या स्थितीत वावरता येत नाही. शंका घेतली तर समर्थ अंतर लावू देतील का? (पुढे सुरु….३) ©️

You cannot copy content of this page