मानव षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटलेला असतो. अहंकाराने क्रोधाने बरबटलेला असतो. त्याचा क्षय करणारे असे तत्त्व ! त्यालाच म्हटलेले आहे विषय !
याचा क्षय कोण करतो? तर ईश्वर ! सेवेकरी करेल का? सेवेकर्याच्या ठिकाणी लिनता, नम्रता, शांती हा त्रिवेणी संगम असेल तर क्षय करायला वेळ नाही. सेवेकरी सद्गुरु आदेशाप्रमाणे वागत असेल तर क्षय करण्यास वेळ नाही. द्वैत भक्ती करणाऱ्या मानवाचा षड्विकार कधी मेलेला आहे का? द्वैत भक्ती करणाऱ्या मानवाचा षड्विकार कधी का मरत नाही? कारण त्याला थोडे चमत्कार, नमस्कार करता आले म्हणजे त्याला वाटते मी कोणीतरी आहे. माझ्यासारखा कोणी नाही. माझी कृती कोणाला साधणार नाही. अशी त्याची भावना असते. म्हणून षड्विकार मरत नाहीत. गुरुची विद्या गुरुवर चालवतो, पण गुरु देखील बाकी काही ठेवतातच. अशा मानवाचा षड्विकार मरत नाही.
सेवेकरी पूर्णात पूर्ण मिलन झाल्यानंतर, संशय रहित झाल्यानंतर, षड्विकार रहित झाल्यानंतर, त्या वेळेला विषय म्हणजे ईश्वर सेवेकर्याला आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. असा सेवेकरी झाल्यानंतर विषयाला मिलन करू शकतो की नाही? अशा गतीने सेवेकर्यांनी जावे. षड्विकारांचा क्षय करण्याचा विचार असतो पण ते कसे मरतील? तर सद्गुरु चरणात, स्वरूपात पूर्णपणे लिन होईल, त्या वेळेला षड्विकारांचा नाश आपोआप होऊ शकतो. म्हणून हल्लीच्या सेवेकर्यांनी जे करावयाचे ते हेच करावे. (पुढे सुरु….३)©️
