Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

विषय – ©️

विषय – ©️

विषय – ‘वि’ म्हणजे काय? आणि ‘षय’ म्हणजे काय? ‘वि’ म्हणजे विश्वकर्ता. षय म्हणजे संशय रहित. न पाहता येणारे असे तत्व. वि याचा अर्थ विश्व आणि विला स्वर लावल्यानंतर ईश्वर ही संज्ञा ! षय म्हणजे सर्व संशयांचा क्षय करणारा !

जो विषय आहे तो अखंड आहे. त्याला कोणी तोडीत नाही. तोडू शकत नाही. कोणी तोडलेला आहे का? आणि तो विषय, त्याचे कुणी वर्णन केले आहे का? माझे वर्णन मी करू शकत नाही. म्हणून या विषयांच्या ध्यानात निमग्न राहणे.

मायावी तऱ्हेने मानवांना थोडीफार का होईना, आर्थिक परिस्थिती पडली, तर सेवेकरी विचारवंत होतो. पण विचारवंत होऊन काय उपयोग? होणार आहे ते होते. परंतु थोडा अवधी जातो.

ज्ञान म्हणजे काय? ज्ञान अनेक तऱ्हेचे आहे. अनेक ज्ञानांच्या पाठीमागे न लागता, सत ज्ञानाच्या पाठीमागे सेवेकर्‍यांने जाणे. जे ज्ञान गुप्त आहे, ते कोणी काढून घेऊ शकत नाही. असे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पोपटपंची ज्ञानाची काय जरूर आहे? असे ज्ञान सर्व ठिकाणी भरून उरलेले आहे. असे ज्ञान आपल्याला मिळाल्यानंतर मग काय पाहिजे? दुसऱ्या लपंगी, छपंगी ज्ञानाची आवश्यकता काय? (पुढे सुरु….२) ©️

You cannot copy content of this page