Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

भक्ती कशी असावी? ©️

भक्ती कशी असावी? ©️

श्री समर्थ मालिक – भक्तीला वाद, तमाशा, डांगोरा हे काहीही लागत नाही. भक्ती ही आपोआप होणारी आणि जिव्हाळ्याची भक्ती आहे. भक्तीचा जिव्हाळा कशात आहे? हे ज्याने ओळखले, त्याला सांगण्याची जरुरी नाही. ज्याने ओळखले, याला पटले तो तिथून दूर जाणार नाही. अनेक अघोरांनी काही जरी सांगितले, तरी तो ऐकणार नाही. त्याला भक्तीपासून जरी दूर खेचण्याचा प्रयत्न केला, तरी दूर खेचता येणार नाही.

जे रंगढंगात निमग्न झाले, त्याला सत भक्तीची गोडी लागणार नाही. भक्ती ही उद्धारासाठी आहे. जो स्वतः उध्दरून जातो, तो जगाचा सुद्धा उद्धार करतो. ज्याला उद्धार म्हणजे काय हे कळत नाही, त्याला कळविण्याची जरुरी नाही. ज्याला वाटत असते, माझे काही तरी निराळे आहे, त्याला सांगण्याची जरुरी नाही.

सत भक्ती, गुरुतत्त्व मानपानाला कधी हपापलेले नाहीत. सत मार्गी जाणाऱ्या मानवाला सत मार्गाला लावण्यासाठी हे सत तत्व प्रयत्न करीत असते. याच्याशिवाय बाकी तत्त्व आहे का? याचे शोधन करा.

ज्या व्यक्तीला आपण शरण आहात, ती कशी आहे, हे पाहण्याचा सेवेकर्‍यांनो प्रयत्न करा व सेवेकऱ्याने ठाम राहावे. मी ज्यांना शरण आहे, तेच सत आहे. अशा भावनेने ठाम राहून त्यांच्या संदेशाप्रमाणे प्रमाणे सेवेकऱ्याने वाटचाल करणे हा आदेश आहे.

या ठिकाणी क्षणोक्षणी, पावलो पावली, एकच दिवस नाही, सदा चमत्कार दाखवू लागलो, तर माणसांची रिघ लागेल. बसायला जागा मिळणार नाही. भक्ती होणार नाही. मायावी मानवांची रिघ लागेल. मग त्यांना शांती मिळेल का? तेव्हा आहे हे उत्तम आहे ! (समाप्त) ©️

You cannot copy content of this page