Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

सत्संग – २ ©️

सत्संग – २ ©️

या मुंबापुरीत आपले आसन आहे. तेव्हा या मुंबापुरीत सत किती आहे हे आपणास माहित आहे. त्यात किती अंतर आहे? सत्संग कोणाला मिळतो, तर त्या दरबारचे जे सेवेकरी आहेत, त्यांची संगती मिळवण्याचा सेवेकर्‍यांनी प्रयत्न केला पाहिजे.

पूर्वीच्या संतांना एकमेकांचे सानिध्य एकमेकाला केव्हा मिळेल असे त्यांना वाटत होते. म्हणजे त्यांचे एकमेकां विषयी किती प्रेम होते, आदर होता, जिव्हाळा होता आणि आत्ताच्या या दरबारात गुरुबंधू मध्ये किती प्रेम आहे, किती प्रेम उतू चालले आहे? हे नाते कोवळे आहे. किती नाजुक आहे.

पण गुरुबंधूचे गुरुबंधूं विषयी किती प्रेम उतु चालले आहे हे मी जाणतो. गुरुबंधू प्रेम, जन्म दिलेल्या मात्या-पित्या पलीकडचे आहे. पाठीच्या बंधु पेक्षा गुरुबंधू हे नाते फार निराळे आहे. ते कोणालाही तोडता येणार नाही. तोडू शकणार नाही. पाठिचा बंधू फक्त याच जन्मात, परंतु गुरुबंधू हे अखंड नाते आहे.

असे असताना, वितंडवाद का घालावा? का आपुलकी नसावी? माझे गुरुबंधू एकाच ठिकाणी शरण आहेत, हे नाते किती कोवळे आहे? कशाला आपण डावलून जाणे, याला सत्संग म्हणता येईल का? एकमेकांशी आपुलकीने, जिव्हाळ्याने राहणे. तो माझा आहे अशा भावनेने राहणे. सर्वांना जन्म देणारा एकच आहे, अशा भावनेने वागणे, तर ते नाते किती प्रेमाचे होईल? अशा तऱ्हेने जिव्हाळ्याने राहिल्यानंतर त्याला सत्संग म्हणता येईल. (पुढे सुरु….३)©️

You cannot copy content of this page