Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

ॐ कार साधना ७

ॐ कार साधना ७

ॐ कारांचे प्रगटीकरण व सृष्टीची निर्मिती – ॐ च्या उच्चारणात तीन अक्षरे सामावलेली आहेत. ती म्हणजे अ-ऊ-म होय. ही तीन अक्षरे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतिनिधित्व करतात.

जसे, अ हे अक्षर ब्रह्म, ऊ हे विष्णू व म हे महेश अर्थात शंकर यांचे प्रतिक होय असे म्हटले जाते. यांना त्रिगुण या नावाने देखील ओळखले जाते. या त्रिगुणांची निर्मिती ओंकारांपासूनच झाली असे आपल्या दरबारचा इतिहास सांगतो.

निराकारातून धुनधुनकार व धुनधुनकारातून ॐ कार प्रगटले, म्हणजेच निराकारातून जे आकारात प्रसवले ते ॐकार होय ! यानंतरच सृष्टीची निर्मिती झाली व तिच्या देखभालीसाठी त्रिगुणांची निर्मिती झाली !

ॐ कार जपाचे प्रकार – ॐ काराचा जप केला जातो, जो आपणांस ध्यान साधना किंवा ध्यान मार्गाकडे घेऊन जातो. ॐ कार जप करताना प्रामुख्याने शरीराच्या तिन भागांचा विशेषत्वाने समावेश होत असतो. यामध्ये अ चा उच्चार पोटाच्या नाभिकमल या भागातून होतो, तर अ+ऊ = ओ चा उच्चार हा छातीतून होऊन, शेवटी म चा उच्चार बंद ओठातून केला जातो. त्याचप्रमाणे हा जप वैखरी, मध्यमा, पश्यंति व परा ह्या वाणीच्या चार प्रकारे केले जातो असेही म्हटले जाते. (पुढे सुरु….८)

You cannot copy content of this page