श्री समर्थ मालिक - भक्त हा भगवंतावर अन् भगवंत हे भक्तावर अवलंबून असतात. भक्ती प्रेम निर्माण झाले की मनाची चंचलता आपोआप दूर होते. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण वाटते. मन शुद्ध झाले की भक्तीत कठीणता नाही. सर्वभूतेषु एकच तत्व आहे, पण अनंत रूपे अनंत नामे याने नटलेली महामाया ही नटविली कोणी? तर…
श्री समर्थ मालिक - आचार विचार सोडलेल्या मानवांसाठी पूर्ण विचार करावा लागतो. भरपाई झाल्याशिवाय हात घालता येत नाही. एकच, भक्तगणांनी धीर सोडू नये. आज कालचा हा काळ नाही. पूर्वीपासून हे चालत आलेले आहे. सत भक्ताला असताचा त्रास होतो. सेवेकरी त्यातून तापून कसून निघाल्यानंतर पूर्ण प्रकाशित होतो. पण त्याला कळत नाही. मातलेले अघोर त्या ठिकाणी शरण…
श्री समर्थ मालिक - आज कोकण आसनाला मानवी त्रास आहे हे मी जाणतो. हे मानव नसून अघोर राक्षस आहेत. त्यांना सताची परब्रम्हाची ओळख नाही, मग त्यांना काय कळणार? म्हणून सत मानवांना त्रास होत आहे. त्या ज्योती पूर्णत्व अहंकाराने बरबटलेल्या आहेत. हा अहंकार सतावर तात्पुरता मात करीत आहे. ही सर्वस्व घटना परब्रम्ह तत्व पहात आहे. ते…
श्री नर्मदा निवासी मालिक – कर्तुम् अकर्तुम् जी शक्ती आहे, त्यांच्या भक्तांना व्याप होतात. त्याची पाहणी करणे कर्तव्य आहे. आकाराला चेतना देऊन निराकारी पदाने व्यवहार करणारी ती शक्ती लाघवाने खेळ खेळते.
कृष्णावतार त्यांनी नटविला हे मला मान्य आहे. त्यावेळी पार्थाला सांगितले, “मी पाप पुण्या निराळा ! सुख दुःखा वेगळा ! मज दंड कोण करी?” असे…
श्री समर्थ मालिक - मानव कसा चालला आहे हे आपण पाहतोच आहोत. म्हणतो, बिचारे पशुपक्षी यांनी काय केले आहे? परंतु पशुपक्षी यांचे जरी हाल झाले तरी त्यांना देहात कुठपर्यंत ठेवायचे? त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने मोकळीकता करावयास हवी.
अदृष्य शुद्धीकरण जे आहे ते थोडेसे आहे. अखेर अखेर संपूर्ण झाल्यानंतर या भारत भूमीचे आणि महाराष्ट्राचे…
श्री समर्थ मालिक - या ठिकाणी आसनाचे सानिध्यात काय चालते, हे सेवेकऱ्यांना माहित आहे. त्याचा त्यांना अनुभव आहे. या मार्गात तो गुंतला, या मार्गाने तो जाऊ लागला कि तेव्हाच ही गती माहीत होते.
सेवेकरी म्हणा, भक्त म्हणा याचे बोलणे जास्त, पण कृती कमी अशा तऱ्हेची गती असू नये. इतकेच काय, त्यांना एवढे सुद्धा भान…
श्री समर्थ मालिक - पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक तत्त्वे फेकलेली आहेत. त्यांना काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराच्या अनुसंधनाने आपले कर्तव्य ते करीत असतात. त्यातून चूक जरी झाली तरी पण त्यांना समजूतीने गती देऊन क्षमा केली जाते. त्या अधिकारात थोडेसे तुझे माझे होते. जसे भक्त, त्या बाजूने ओढण होते. म्हणून मला त्या ठिकाणी जावे लागते. …
श्री समर्थ मालिक - सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये सत किती आणि असत किती प्रमाणात आहे हे आपणास पूर्ण माहित आहे अन् याचा उहापोह मागे केलेला आहे. आजच्या परिस्थितीत सतावर पुष्कळ दडपण आहे म्हणून पुष्कळ त्रास होतो, तरी सुद्धा कर्तव्य होत आहे. आता थोडे दिवस बाकी राहिले आहेत. मग आपणास कळेल कुणाची बाजू सरस आहे ते. सत्…
श्री नर्मदा निवासी मालिक – प्रत्येकाने आसनाची मर्यादा ही ठेवलीच पाहिजे. महान तत्व, महान पद जरी असले तरी त्याच्याकडून चुका ह्या होतात, मग मानवांचे काय?
लाघवी तऱ्हा मी करू शकत नाही. लाघवी तऱ्हा करणारे करतात. माझे त्यात काही नाही. भक्तीची अंगे दोन आहेत – १) एक सत् भक्ती अन् २) दुसरी असत भक्ती.…
श्री समर्थ मालिक - मोहाला बळी पडणाऱ्या ज्योती या पुष्कळ आहेत. सत्यासाठी जगणाऱ्या ज्योती व्यासपीठावर अजून उभ्या राहिल्या नाहीत. त्यांना कोणी पुढे येऊ देत नाही. याला कारण अघोर आहेत. ही ज्योत अघोरांच्या ओंजळीने पाणी पीत आहे. होते ते चांगल्यासाठी होते. आपल्या आदेशाप्रमाणे हिला संरक्षण दिले होते. या पदावर आलेल्या ज्योती यातच गुरफटून जातात. त्यांना मोह…
कलियुगाचा मध्य उलटला आहे. स्फोट होणारच आणि त्याप्रमाणे दिसण्यात येईल. गती घेण्याचा काळ अगदी समीप आला आहे. ज्या वेळेला कर्तव्य परायणता होईल, त्यावेळेला पूर्णत्वाने संदेश मिळतील. दिले जातील. चिंता करावयाची नाही. सत्य म्हटले तर, हे कलियुग आहे. सत आहे हे. ते सत् तरी कशावरून? स्थिती गती नुसार ह्याची कल्पना येतेच आहे.
कोकणात स्थापित झालेले आसन…
प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. त्याच्या पूर्व संचिताप्रमाणे जे लागेबांधे आहेत ते श्रेष्ठ आहत. हे नाते (सद्गुरु आणि सेवेकरी) अखंड आहे. अखंड पद आहे. ८४ लक्ष योनीत जरी सेवेकरी भटकला तरी सद्गुरु पदाचा ठाव घेण्यासाठी त्याला पुन्हा मानव जन्मात पाठवितात. तेव्हा सद्गुरूंच्या मुखातून मिळालेले अमृततुल्य प्रणव जतन करणे हे सेवेकऱ्यांचे महान पवित्र…