Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

अखंड तत्त्वापासूनच ॐ कारांची निर्मिती ©️

श्री समर्थ मालिक - माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य वगैरे काही नाही. मला कोणीही पाहू शकणार नाही. पाहता येणार नाही. जो पहावयास आला, तो माझ्यातच रममाण झाला. लयबद्ध झाला. मला अनंत हस्त, अनंत चक्षू, अनंत पाद असा मी आहे. माझे वर्णन कोणालाही…

Read More

आकार कोण आहेत, हे ओळखा ©️

श्री समर्थ मालिक - माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे बोल अन् सताचे बोल यावर लक्ष ठेवा. काही सेवेकऱ्यांना सताचे बोल कसे ओळखावे याची कल्पना नाही. आपण ज्या आकाराला शरण आहात, त्याच्याच आवाजाप्रमाणे आवाज ओळखणे हेच सताचे बोल ओळखावेत. सर्वांना अन्न पाणी देणारे, पोसणारे हे एकच तत्व आहे. ते सर्वभूतेषु…

Read More

मानव फसला जातो…©️

श्री समर्थ मालिक - मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते. इतकेच सांगावयाचे आहे, याची मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले. हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर वेगळे तत्व आहे असे…

Read More

एकमेकांचे प्रेम, अखंड झरा हृदयामध्ये पाझरा…©️

श्री समर्थ मालिक - विठ्ठल विठ्ठल गजरी | अखंड तत्व आपणास आसनावरून बहाल केलेले आहे. सत मुखाची वाणी, ज्यांनी असे म्हटलेले आहे - विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी || नामाचा गजर कोठे होतो? अन् त्या नामाची पंढरी कशी आहे, कोठे आहे? कशी दुमदुमून गेली होती? कशी दंग झालेली होती विठ्ठल नामात…

Read More

अखंड तत्व कोठे आहे…©️

श्री समर्थ मालिक - अखंड तत्व कोठे आहे? त्याचा वावर कोठे आहे? हे आपणाला कळलेच असेल. सेवेकऱ्यांनो ठाम श्रद्धा, अढळ विश्वास, दृढ: निश्चय असल्यास सर्वस्व होते. डळमळीत असल्यास काहिही होणार नाही. म्हणून ठाम व अखंड श्रद्धा ठेवा. वाट भुलता कामाची नाही. हे सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे. त्या ठिकाणी काहींची मनोभावना आहे, पूर्वी होते पण आता काही…

Read More

ठाम असाल तर ते कर्तव्य आपोआप होईल…©️

श्री समर्थ मालिक - अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य संपते. जो अघोर मानव गुळाने मरतो, त्याला विष पाजण्याची आवश्यकता असते काय? एवढेच कि थोडा अवधी लागतो. सत् भक्ताला थोडे कष्ट झाले तरी चालेल. अघोराचे थैमान जिथपर्यंत चालायचे तिथपर्यंत चालू द्या. हे…

Read More

मनोभावना शुद्ध आहे का? ©️

श्री समर्थ मालिक - या आसनाच्या सेवेकऱ्यांना अनेक वेळेला टोचणी दिलेली आहे. सर्व सेवेकऱ्यांची मनोभावना शुद्ध आहे का? आसन आदीअंता पासून आहे. आसनाधिस्त आदीअंता पासून आहेत. काही गुप्त गोष्टी गुप्त असतात. सत् त्या गोष्टी गुप्त ठेवतात. अर्जुनाला देखील सांगितले होते, “सत् असताचा वादविवाद चाललेला आहे." याच्यासाठी कोणत्याही सेवेकऱ्यांनी, “बस, गती घे ! मला…

Read More

दृश्य आहे तेच अदृश्य आहे…©️

श्री समर्थ मालिक - सेवेकरी आहेत. सेवेकऱ्यास ज्ञानाप्रमाणे कुठे घालवायचे व ठेवावयाचे, त्याचे ज्ञान पाहिजे आहे अशी सेवेकर्‍यांनी अपेक्षा करू नये. कोण देतो अन् कोण घेतो ? ज्यांना ज्यांच्याकडून अखंड तत्व मिळाले आहे, त्यांचे आदेश, त्यांचे संदेश त्यांनी मानले आहेत काय? आम्ही मानव आहोत. कर्तव्य करीत आहोत. पण प्रत्यक्षात या दरबार मध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांच्या…

Read More

जपतप, खटपट करून ज्ञान मिळविता येईल काय? ©️

श्री समर्थ मालिक - जपतप खटपट केलीस काही | ज्ञानावाचून मुक्ती नाही || ज्ञान पाहिजे जरी सत्य | तरी करी तू नित्य योग्य हे पथ्य || ज्ञान म्हणजेच प्रकाश ! संतांचे ज्ञान पोथी पुराणे वाचून आलेले नाही. हे संत आहेत काय? टाळ वाजवून कितीजणांनी हे मिळविलेले आहे? जगाच्या जननी पुढे कीर्ती चालली आहे. केवढे जपतप…

Read More

पुण्यस्मरण दिन ३३ वा

परम् पूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज परम पूज्य श्री सद्गुरु माऊली भगवान महाराज पुण्यस्मरण दिन - आजचे हे ३३ वे वर्ष असून माऊलींचा हा मानवी तर्हेने आपल्यासाठी विरह दिनच होय. आपण आज तेवढ्या उंचीपर्यंत पोहचलेलो नाहीत अन्यथा हा शब्दप्रयोग येथे करावा लागला नसता. तरी सुद्धा आपण आपल्या श्री सद्गुरु माऊलींनी दाखवून दिलेल्या, बहाल…

Read More

असे ते सद्गुरु तत्व आहे…©️

श्री समर्थ मालिक - अनुग्रह - अनुग्रह मिळण्यासाठी प्रथम भक्तीचे वळण लागते. पूर्व संचिताप्रमाणे त्याचे कर्मसंचित दूर सारून त्याला सानिध्यात घेतले जाते. मग त्याची ती कृती कितपत ठाम आहे हे पहावयाचे असते. ज्या ज्योतीला अनुग्रह पाहिजे आहे, त्या ज्योतीने सत गतीत राहिले पाहिजे. सेवेकर्‍यांना, महान महान तत्वांना, ऋषीमुनींना अनुग्रहाची गती आहे. आदेश सुटल्यानंतर अनुग्रह,…

Read More

सद्गुरु येथे आहेत तोपर्यंत साधा, साधून घ्या ©️

श्री समर्थ मालिक - सेवेकरी कसाही असो, सद्गुरु जितके कठीण, तितकेच ते लोण्यापेक्षाही मऊ आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे सेवेकरी वाटचाल करू लागला तर ते कधीही कठीण होणार नाहीत. सेवेकऱ्यांचे, सर्वस्वांचे निधान या ठिकाणी आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी सावधगिरीने वागावे. तुम्ही नामात दंग राहिलात, मग कुठेही जा, ते तुमच्या पाठीशी आहेत. सद्गुरुंचा आदेश, प्रणव…

Read More

You cannot copy content of this page