Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

एकमेकांचे प्रेम, अखंड झरा हृदयामध्ये पाझरा…©️

एकमेकांचे प्रेम, अखंड झरा हृदयामध्ये पाझरा…©️

श्री समर्थ मालिक – विठ्ठल विठ्ठल गजरी |

अखंड तत्व आपणास आसनावरून बहाल केलेले आहे. सत मुखाची वाणी, ज्यांनी असे म्हटलेले आहे – विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी ||

नामाचा गजर कोठे होतो? अन् त्या नामाची पंढरी कशी आहे, कोठे आहे? कशी दुमदुमून गेली होती? कशी दंग झालेली होती विठ्ठल नामात ! मग त्याचप्रमाणे सेवेकरी त्या नामाने, विठ्ठल नामाने दुमदुमला जाईल त्या नामाने दुमदुमलेली पंढरी शुद्ध असेल की अशुद्ध असेल? शुद्ध असेल. मग त्याचप्रमाणे आपल्या दरबारातील सेवेकरी त्या नामाने दुमदुमलेले आहेत का? त्या विठ्ठल नामाने तर सेवेकर्‍यांनी पंढरपुरी दुमदुमून गेलेली आहे, तर आणखी इतर व्याप आणि इतर तऱ्हा का लागू पडतील? हे योग्य आहे कि अयोग्य आहे? सेवेकर्‍यांनी हे लक्षात ठेवावे की याच्यातच मर्म आहे. ते आकळले पाहिजे.

प्रकृती म्हणजे ती पंढरी आहे. विठ्ठल नामाने म्हणजेच अखंड नामाने ती दुमदुमून गेली पाहिजे. मग त्या मायेला बंधन घालून दुमदुमलेले पडसाद पडले, मग इतर निसर्गाचे लाघव होतील काय? अखंड तत्व तुमच्यापासून दूर होईल काय? मग सेवेकर्‍यांनी खरोखरच काय करावयास पाहिजे? तर नाममय झाले पाहिजे. मग आपले सद्गुरु दर्शन दूर नाही.

पण इतकेच, आपले सेवेकरी तितके तन्मय होत नाहीत. अन् सेवेकरी अशा दुमदुमल्या पंढरीमध्ये सद्गुरु नादात तल्लीन झाला आहे काय? गुंग झालेला आहे काय? मी सांगतो ते आपल्याला टोचक शब्द आहेत काय? आपण त्यातच लयबद्ध व्हा. अशाने प्रकृती अभिन्न होते, मग तुम्ही आणि मी एकच !

मग एवढे होण्यासाठी सर्वस्व सेवेकरी आनंदी वातावरणात असावेत. कोणीही कोणाला वाईट इच्छेने वागवू नये. सेवेकर्‍यांनी सेवेकर्‍याला वाईट भावनेने पाहू नये अन् अमृता पेक्षाही गोड प्रेमाने वागावे असे संदेश आहेत. सख्खे भाऊ, केव्हा ना केव्हा, कधीतरी वाटा मागतातच, पण हे गुरुबंधूंचे नाते आहे, ते केव्हाही वाटा मागणार नाहीत. तो उपयोगी पडेल त्याप्रमाणे सेवेकर्‍यांनी वागावे अन् हसत खेळत काळ घालवला पाहिजे. पण हा काळ अगदी नजीक येत आहे. एकमेकांचे प्रेम, अखंड झरा हृदयामध्ये कसा पाझरेल ते लक्षात ठेवा. म्हणजे सांगितल्याप्रमाणे विठ्ठल नामाची पंढरी कशी दुमदुमून जाईल ते केल्यानंतरच समजेल. तोपर्यंत नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page