श्री समर्थ मालिक - गुरुपदाच्या मुखातून निघालेली अमृततुल्य वाणी झेलने हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. आपण मानव आहात. संशयात, षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटलेले आहात. या सर्वस्वातून सुटका करणारे एक महान श्रेष्ठ पद आहे. तेच हे गुरुपद आहे. त्या गुरुपदाशिवाय सेवेकऱ्यांना वाचविणारे, तारणारे, त्यांचे कोडकौतुक पुरविणारे दुसरे कोणीही नाही.
सद्गुरु आणि सेवेकरी…
श्री गुरु पौर्णिमा समर्थ संदेश - सतपुरुष आणि सेवेकरी यांची यथासांग पूजा शांत वातावरणात व्हायला हवी. पूजा करताना कोणीही घाबरण्याची आवश्यकता नसते. ती करताना शांत विचार ठेवूनच करावी. प्रेम भावनेने केलेली पूजा मान्य करून घेणे असते.
या ठिकाणी व्यास पूजेची किती वर्षे झाली? म्हणून सेवेकऱ्यांचे हे ठिकाण पवित्र अन् सेवेकऱ्यांचे कर्तव्य हे पवित्र हे…
रुक्मिणी माता – (आषाढी एकादशी) प्रथमच म्हणावेसे वाटते, आपण ज्यांना परब्रह्म म्हणता, त्याच ठिकाणी माझी मान लवते, त्यांनी (विठ्ठलांनी) सुद्धा तेथे मान लवविली, मग सांगा परब्रह्म कोण? श्री विठ्ठल कि आणि कोणी? माझे कर्तव्य मी करीत आहे. पण एवढेच आहे, जे सर्व भूतेषु पश्य ते सर्व ठिकाणी व्यापक असून सुद्धा अलिप्त आहेत. याची गती मिळण्यासाठी,…
श्री विठ्ठल - मन गढूळ कां होते? मन गढूळ होते कारण हा संसार आहे ना ! एका भक्ताने म्हटलेले आहे, “दिल गया तो जाना दे | मत जाना दे शरीर || ना खेचेगा कमान | तो कहा से लगेगा तीर ||" त्याचे शेले मी विणले ते का? चोखोबा संगे ढोरे ओढली, जनाची लुगडी धुतली याची…
श्री विठ्ठल - आपल्याच हृदयी सद्गुरूंचा वास आहे. मन रानोमाळ भटकविण्याची आवश्यकता काय?
परंतु ही आपली दश इंद्रिये केव्हा आणि कधी निमग्न होतील? प्रत्येक सेवेकऱ्याचे मन शुद्ध सात्विक असेल, जास्तीत जास्त सद्भावनेने सेवेकरी राहील तर सद्गुरु दूर नाहीत. मग काशी, गया, प्रयाग वगैरे यात्रा करणे काहीही नको.
पतिव्रता ही पतीला मानण्यावर आहे.…
श्री विठ्ठल - आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे. मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन केले आहे. आदेश देणारे, कार्य करून घेणारे कोणीतरी वेगळे आहेत. भगवंत आहेत अशी ती खुण दाखविणारे आकारी तत्त्व वेगळे असले पाहिजेत, मग मी आकारी आहे का?
एकादशी या महान महत्वाच्या दिवसाचा…
श्री विठ्ठल - दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वा जवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी? जे सत् तत्व आहे…
आजचा आनंदाचा दिवस अन् आनंदी वातावरणात सर्वस्व सेवेकरी, ऋषीमुनी, आनंदात आहेत. १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. १४ वर्षात आजचा हा शेवटचा दिवस म्हटला तरी चालेल. म्हणून आजच्या या शुभदिनी सर्वस्वांना मोकळीकता दिलेली आहे. अजून दर्शन चालू आहे. दुसरी गोष्ट, भारताचा आनंदाचा दिवस थोडक्याच दिवसात चमकणार आहे. भारतातील लोक विचित्र, त्याच्या दुप्पटीने महाराष्ट्रातील आहेत. पण महाराष्ट्रात…
श्री समर्थ मालिक – विषय हा एकच आहे. तो म्हणजे भक्ताने आपले कर्तव्य करणे, आपल्या कर्तव्यात राहणे. विषय हा नेहमीच आहे, पण ज्ञान? ज्ञानापासून प्रकाश ! अजून काही जण प्रकाशित व्हावयाचे आहेत. एकच विषय - अखंड नाम ! ज्या आसनावरून अखंड नाम मिळाले आहे, त्या अखंड नामात, सेवेकर्यांनी त्या कर्तव्यात राहणे. विषय हा गहनच आहे.…
श्री समर्थ मालिक - येथून पुढे काय होईल हे सांगता येत नाही. उ:शापाचा काळ संपत आला आहे. आणखीन काही दिवस त्रास होईल, पण सेवेकर्यांनी बिलकुल घाबरू नये. तिजोरी (नाम) दिली आहे. तिची जोपासना करणे.
हल्ली ठिक ठिकाणी अनुभव मिळत आहे की संकटाच्या वेळीच मानवांना माझी (भगवंताची) आठवण होत असते. सुखी असले म्हणजे हजार दैवते…
श्री समर्थ मालिक - दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | चोर आणि साव सारखाची || तेव्हा कोणाची कृपा आहे? कोणाची तरी कृपा आहे असे आपणास वाटत असेल तर निवेदन करावयास नको कां? काही चोर पण आहेत, काही साव पण आहेत. काहींनी चोरी केली तर मला त्याची जाण आहे. मी कणाकणात भरलेलो आहे. चोरांना केव्हाही…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी मी रहित, मनाचे जोगे सिद्धी पावे असे होतील कां? पण सेवेकरी होत नाहीत. त्याला मी काय करावे? बघा. प्रयत्न करा. आसनाधिस्त काय सांगतात ते ऐका. विचारवंत व्हा अन् काही तरी करा एवढे संदेश देत आहे. शांतता आणि समता या ठिकाणी ठेवलीच पाहिजे. आता येथून पुढे सेवेकर्यांनी विचार करण्याचा प्रयत्न…