Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

अंधश्रद्धेचेच लोक जास्त असतात…©️

अंधश्रद्धेचेच लोक जास्त असतात…©️

श्री विठ्ठल – देही अन् विदेही –

देही अन् विदेही बनवितो कोण? अज्ञानी मानवांना हे काही समजू शकणार नाही.

सत तत्व जे आहे, ते फार दयाघन आहे. जडत्वाने नटलेल्या मानवांना ह्याचे पूर्वीचे गाठोडे पाहून सानिध्यात घेतले आहे. कोणत्याही मानवाची मनोभावना असते, भक्ती करतो, नामस्मरण करितो, ते मी करतो. यातूनही परमेश्वर मला भेटत नाही म्हणून परमेश्वर हे तत्व कोठे आहे अन् कोठे नाही हे त्या अज्ञानाना कळले असते तर ते भटकत फिरले नसते.

याचे ज्ञान नाही म्हणून, काशी, बनारस, मथुरा, प्रयाग इकडे तिकडे भटकतो. पंढरीला जातो. आणखी दुसरीकडे जातो. दत्ताच्या ठिकाणी जातात. पण दत्त कोण हे त्याला कळले नाही. कोणाच्या सत्तेने जातो, हे पण त्याला कळलेले नाही. मला पण कळत नाही. मानवाला याची गती मिळाली, तर पंढरी सोडून मी येथे आलो ते खरे की खोटे याची गती मानवाने घेतली पाहिजे. बरे, मी या ठिकाणी आलो ही गती ज्ञानवंतानी घेतली, तर हे ज्ञान मिळते कुठून? तर सद्गुरु कृपेने ते मिळते. मग या रस्त्याने जाणारे सेवेकरी, ज्ञानरूपी दरीत घुसले त्यानंतरची ही जाणीव आहे. पण पंढरीला येतात त्यांनी मला पाहिले आहे का? अंधश्रद्धेचेच लोक जास्त असतात. ©️

You cannot copy content of this page