श्री संत एकनाथ महाराज –
जनार्दन म्हणजे जनाला धन, विद्या देणारे, जनांच्या वेगळे असणारे तत्व ! अनंत रूपाने आहेत ते ! एकच तत्व गुरुस्वरूप नटले आहे ! पण प्रकृती भिन्न असल्याकारणाने पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. समदृष्टीने पाहिल्यास एकच तत्व, ॐ कार स्वरूप नटलेले आहे.
प्रकृती भिन्न आहे, परंतु तत्व अभिन्न आहे. अभिन्न दृष्टीने पाहिल्यास, एकच तत्व सर्व ठिकाणी विखुरले आहे हे पाहता येईल. ज्याला मुक्ती मोक्ष पाहिजे असेल, त्याने सत् सोडता कामाचे नाही.
या ठिकाणी महान महान विद्वान पंडित आले तरी त्यांना चाचपडावे लागेल, हे ध्यानात ठेवा. म्हणजे या ठिकाणी बोलण्यास सुधरणार नाही. कारण या ठिकाणी सताचा वास आहे. पोपटपंची या ठिकाणी चालणार नाही. (समाप्त)
