Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

विठ्ठल कुठे आहेत…©️

विठ्ठल कुठे आहेत…©️

श्री विठ्ठल – काही लोक मूर्तीच्या दर्शनासाठी लोकांचे सोटके खातात. काही तर पुढे पण येत नाहीत. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जास्त गर्दी असते. धक्का बुक्की होते, मार खावा लागतो. पण विठ्ठल कुठे आहेत, हे कोणी पाहिले आहे का? मग जर हे कळत नाही, मग माळा घालण्यात अन टिळा लावण्यात अर्थ तरी काय आहे? उपयोग काय? जितके माळ घालणारे आहेत, ते एकून एक शुद्ध आहेत कां?

पूर्वी मी जी स्थिती त्या ठिकाणी करीत होतो, ती आपल्या सांगण्यावरून बंद केली. पैसेवाले हौसेने येतात. नादान वृत्तीचे गवसे पण येतात. साध्या भोळ्या भाबड्या स्त्रिया येतात अन या गवशांचे लक्ष त्यांच्या दागिन्यांवर असते. तेव्हा पंढरीची स्थिती अशी आहे. त्या ठिकाणी काहींचे मुडदे देखील पडलेले आहेत. मग मरीला संदेश देऊन ठेवले होते, ते कशासाठी ठेवले होते?

सद्भक्त निष्काम भावनेने माझ्यात रममाण होतो. त्याची फक्त मला डोळे भरून पाहण्याचीच इच्छा असते. मग मी पण त्याच्यापासून दूर जात नाही. पण हे घेईल त्याला. न घेईल त्याला काही नाही. हे काही संतांनी अनुभवले आहे. त्यांनी अभंग रूपाने रचना केली आहे. लिखाण केले आहे. त्याचे इतर लोकांनी ज्ञान घेतले आहे का? घेतले म्हणावे तर पंढरीला येण्याची आवश्यकता काय? ©️

You cannot copy content of this page