श्री समर्थ मालिक - सेवेकरी जसा पाहील तसा त्याला अनुभव देणे होत असते. त्या तऱ्हेने सेवेकऱ्याने पाहिले असेलच. असे कोणी पाहिले आहे का? सेवेकर्याची मनोबुद्धी जशी जाईल तसा त्याला अनुभव द्यावा लागतो. इतकेच की, मन शुद्ध सात्विक स्फटिका सारखे पाहिजे, मग त्या ठिकाणी त्याचे सूक्ष्म खडे असते. ध्यान कोणाचे करावे हे त्याने ओळखावे.
मी…
श्री समर्थ मालिक - सत् संपत्ती दिसत नाही. दृश्य संपत्तीला मानव मोहवून होतो. मोह पाहिजे, पण तो मोह कसा पाहिजे? शुद्ध आणि सात्विक मोह असेल तर अघोर संपत्तीच्या मागे तो लागणार नाही. दृश्य संपत्तीपेक्षा सत् संपत्ती श्रेष्ठ आहे.
मी कोणाला शरण आहे? कोणावाचून काय घडते, धनसंपत्ती कोठून मिळते? ही खूण सापडली तर तो मोहवश…
श्री समर्थ मालिक - सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला लागेल का? लाघव होईल का? तुझे माझे निर्माण होईल का? म्हणून आपण कैवल्य पंथाचे प्रवचन सुरू केले होते. मग सेवेकर्यांनी या पंथाचा अंत घेतला आहे का?
कैवल्य पंथ म्हणजे क्षणोक्षणी कला दाखविणारे,…
श्री समर्थ मालिक - हल्लीच्या मानवाला परमेश्वर जगात आहे की नाही त्याची भ्रमंती आहे. जगात ईश तत्व वावरते हे दाखविण्यासाठी तसेच अघोर तत्त्वाला तोंडघाशी पाडण्यासाठी, त्याला काही ना काही करावे लागते. त्यांनी लवकरात लवकर कार्य करावे ही अपेक्षा आहे.
डोळे नसतात त्यामुळे अंध:कार निर्माण झाल्यानंतर मर्यादा तुटली जाते. तत्त्वाने डोळे झाकपणा केल्यानंतर सेवेकरी संतप्त होतो,…
श्री समर्थ मालिक - मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला सुद्धा त्याचा दुरुपयोग करता येणार नाही. त्यांना ते कर्तव्य उद्या परवा केलेच पाहिजे. हा आदी अंतापासूनचा सिद्धांत आहे.
आधीच्या काळापेक्षा आत्ताचा काळ फार न्यारा आहे. त्यासाठी कर्तव्य लवकर व्हावे असे आपले…
श्री समर्थ मालिक -
मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात.
एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त होताना सेवेकऱ्यांनी एकचित्तता साधावी व एकचित्त होत असताना पाहणी करावी की आपण कोणाशी एकचित्त होत आहोत.
ज्ञानप्रकाश कसा मिळतो? त्याची माहिती शरण गेल्यानेच होते. ज्ञानप्रकाश ! मग तेच ते सर्वस्व…
श्री समर्थ मालिक - ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते.
दरबार मध्ये जी गती मिळाली, त्यामुळे अनेक सेवेकऱ्यांच्या भावना चलबिचल झाल्या असतील. पहिल्यांदा दोन ज्योती आल्या. नंतर तिसरी ज्योत आली. तदनंतर चौथी ज्योत आली. सेवेकर्यांनी ओळखले पाहिजे. त्याच्यासाठी सेवेकर्यांना ज्ञान, दिव्यदृष्टी व…
श्री समर्थ मालिक -
ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान आहे, बुद्धी नाही.
बुध्दी कुठून मिळते? म्हणजेच ज्ञानापासून प्रकाश व प्रकाशाच्या अनुसंधानाने बुद्धी ! सर्व काही सतापासून मिळते.
इतकेच, सेवेकर्यांना ज्ञान बुद्धी दिली, तरी विचार ज्ञान चालवता येत नाही. दरबार…
श्री क्षिराब्धी - संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडी ओल्याला सुद्धा झळ लागेल. याकरिता सेवेकरी व सेवेकरीणी यांना आपल्या नामस्मरणाच्या गतीने चालत असताना, संधी काळाचा तितका त्रास होणार नाही.
आतापर्यंत संधीकाळ संधीकाळ येणार असे किती वर्षे म्हणत आलो. संधीकाळ ही साधीसुधी गोष्ट…
श्री समर्थ मालिक - माझे शास्त्र कोणाला सापडले आहे का? हा मृत्यू गोलार्ध आहे. यात जडत्व मानव आहे. त्यात अखंड तत्त्वाचा वास आहे.
अखंड म्हणजे काय? अन् खंड म्हणजे काय? मग खंड निर्मिती कोणापासून झाली? अखंड पासूनच खंड निर्माण झाला. त्यांनी फेकून द्यावयाचे ठरविले, मग कुठे फेकून देतील हे सांगता येत नाही. म्हणून…
श्री समर्थ मालिक - मानवांची मनोभावना कशी तृप्त होते? दुसऱ्याचे ऐकून ती तृप्त होते कां? तर ती तृप्त होत नाही. जरी ते चंद्रावर गेले, तरी ते महासायासाने गेलेले आहेत. त्याही मानवांच्या अंत:र्यामी मीच आहे. पण यात मेख काय आहे? मानव मनाच्या आधीन होऊन चालला, मग त्याचे कोड कौतुक मला पुरवावे लागते. जास्त काही झाल्यास, मग…
श्री विठ्ठल - सद्गुरू साधे, सुलभ. कधीतरी लहरीत असल्यानंतर बोल फेकतात. ते मार्मिक बोल कसे आहेत हे सेवेकर्यांनी ओळखावे. सहज बोलणे असते. यात मर्म आहे. हाच उपदेश आहे. आज तो सेवेकर्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु कृपेने स्वतःची खूण स्वतःच ओळखली नाही, तर तो मानव आहे हे सिद्ध होत नाही. मानवाने ज्याने हे ओळखले, त्यालाच ते…