श्री समर्थ मालिक - या भूमीवर किती अहंकार मातलेला आहे. त्या अहंकाराने सर्वस्वांवर कितीतरी मात केली आहे. गरीब लोकांची काय स्थिती आहे? म्हणून जे कर्तव्य घडवायचे ते घडवून घेणारच ! अन् ते कर्तव्य घडवून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. मायेकडूनच कर्तव्य घडवून घेणार, त्याशिवाय सत कर्तव्याला उज्वलता येणार नाही. सत कर्तव्याची उज्वलता झाली मग काय होईल ते…
श्री समर्थ मालिक - वेद अनंत बोलीला | अर्थ इतकाच काढीला || निजनिष्ठे नाम गावे | शरण विठ्ठलासी जावे ||
वेद म्हणजे काय? हा किती तऱ्हेने सुटतो? बोलाचा अंत सापडला आहे काय? बोल, प्रणव कोठून सुटतात?
चैतन्याची घुसळण झाल्याशिवाय वेदना नाही. वेदना झाल्यानंतर प्रणव सुटतात, ह्यालाच वेद म्हणा अगर काही म्हणा ! हे कोठून,…
श्री समर्थ मालिक - संत समागमे धरुनी आवडी | करावी तातडी परमार्थाची ||
आत्ताच्या युगामध्ये संत मिळणे दुरापास्त आहे. ज्याला भक्तीचे मूळ पूर्णत्वाने सापडले तोच त्या ठिकाणी चिकटून राहिला. तो इकडे तिकडे भरकटत नाही. एकाच ठिकाणी बसून आपल्या तत्त्वाशी तद्रूप राहिल्यानंतर तो शांतच आहे. त्याला सर्वस्व सापडले आहे. त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तोच…
श्री समर्थ मालिक - ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या तऱ्हेचा आहे. चमत्कार नमस्काराला भाळणारे मानव जास्त आहेत. सद्गुरु तत्व काय आहे, याची त्यांना माहिती नाही. ते समजतात, सद्गुरु हे मानव आहेत अन् परमेश्वर तत्त्व वेगळे आहे, अशी त्यांची भावना आहे म्हणून अवधी…
श्री स्वयंभू महेश - भगवंताने आकार मानव रूपातच घेतला आहे. काही कुर्म, वराह सुद्धा अवतार झाले आहेत, पण मानवात अवतार घेऊन त्याने जागे केले तरी तो मानव निद्रिस्तच आहे. हे फक्त प्रकृतीचे चाळे आहेत. प्रकृती अंगाने सेवेकर्यांनी जाऊ नये. ही माझी इच्छा आहे. प्रकृती भिन्न आहे म्हणून सांगत आहे.
भिन्न भिन्न प्रकृती |…
श्री स्वयंभू महेश - हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही.
गुरुपद म्हणजे आकार आला. मानवाला त्याची सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला सद्गुरू चरण कसे सापडणार? ज्याला काही कळत नाही, तो उघड्या धोंड्याला शेंदूर थापून त्याला आकारात आणतो, त्याच्या पाया पडतो पण त्याला बोलता येत नाही. अशा गोल आकारी…
श्री स्वयंभू महेश - ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातच विष नावाचे रत्न निर्माण झाले. चांगली चांगली रत्ने दुसऱ्यांनी घेतली, पण कोणीही विष घ्यावयास तयार होईनात. मग ते टाकावयाचे कुठे? ते विष नामक रत्न आम्ही प्राशन केले.
ते घेतल्याबरोबर सर्व देहाची…
श्री कैलासपती स्वयंभू - मी हिमालय पर्वतावर जो बसलो आहे, तो सताच्या आदेशाप्रमाणेच बसलेलो आहे. या ठिकाणी दरबारात आदेश मिळाल्यानंतरच यावे लागते. मग आदेश पाळणे, मानणे हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य नाही का?
जरी माझे नाव स्वयंभू असले, तरी या स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी स्वयंभू आहे म्हणून, मी एक त्यांचा सेवेकरी आहे असे माझे म्हणणे आहे.…
श्री समर्थ मालिक - सद्गुरु चरण ज्यांना कळले आहे, त्यानांच कळले आहेत. असेही काही मानव म्हणतात कि हि गुरुगीता स्वयंभूनेच लिहिली आहे का? म्हणूनच एका संताने गीता लिहिली आहे. त्याने अनुभव सिद्धतेनेच लिहिले आहे. जशी ज्याची कर्मगती, तशी ती त्याच्या डोक्यात बसेल. म्हणून सांगितलेले सत्य आहे.
मी आहे, त्याला आहे ! नाही त्याला…
श्री समर्थ मालिक - यात काही कमी नाही, रिते नाही, पण सेवेकरी ओळखणारा पाहिजे. प्रकृतीचे खेळ आहेत. ते अतोनात चंचलयुक्त असतात अन् म्हणून ते भिन्न आहे. ज्या वेळेला प्रकृती अभिन्न होईल, त्याच वेळेला सद्गुरु व त्यांची लिला याची गती मिळेल.
मी सर्व भूतेषु पश्य आहे असे निवेदन आहे आणि असे काही सेवेकऱ्यांच्या आढळण्यात आले…
श्री समर्थ मालिक - भक्त भगवंताचे ठाई अन् भगवंत भक्ताचे ठाई असतात. मी कुठे आहे? हे या यत्किंचित मानवांना काय कळणार? मी नाही आकाशी, मी नाही पाताळी. कोण माझा शोध घेणार आहे? जो भक्त आहे, तोच माझा तपास करू शकतो. अघोर कधीही माझा शोध घेऊ शकणार नाहीत.
बरेच दिवस आसनाधिस्तांचा अन् माझा…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने, आसनाधिस्तांनी वशिला लावू नये. ज्योत सात्विक असते पण मनाचे आधीन झाल्यानंतर रस्ता चुकते. तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करीता चुणूक ही दाखवावी लागते.
या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात,…