Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

अमर काय आहे ? ©️

अमर काय आहे ? ©️

श्री संत ज्ञानेश्वर – दिसे ते नासे | न दिसे ते अमर असे ||

जे दिसते, ते स्थूल दिसते. जड दिसते. अन् जे सत् आहे, ते या जडाच्या आंत आहे. ज्यांच्या आधीन हे जडत्व आहे, ते कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने हे जडत्व फेकून देण्याचा प्रयत्न करतात. त्याला कोणी जाळले, तर कोणी पुरले. तत्त्वात तत्व मिलन झाल्यानंतर नाश कशाचा होतो?

नासे याचा अर्थ काय? नासे म्हणजेच ना दिसे ! तुम्ही ज्या वेळेला जन्माला आलात, तत्पूर्वी तुम्ही कुठे होता? त्या वेळेला दृश्य होता की अदृश्य होता? एवढेच, लहान होता. लहानाचे मोठे झालात. मग नाश कोणाचा आहे? जे दिसत नाही, ते पण कधी कधी दिसते.

इतकेच आहे, जे आहे ते दिसते कोणाला आणि नाही कोणाला? ज्याला दिसते त्यालाच दिसते ! ते पाहण्याची दृष्टी, सद्गुरूं शिवाय मिळत नाही. अन् दिसल्यानंतरच सेवेकरी त्यात तल्लीन होतो ना? जड हे फेकून दिल्यानंतर, समर्थ माऊली सूक्ष्माने कोठेतरी नेऊन ठेवतात. त्याला जर परत जन्माला पाठवायचे असेल तर तेच पाठवितात. पण मागच्या जन्माची आठवण त्याला नसते. जर सत मार्गी जाईल तरच सद्गुरु कृपेने त्याला मागील जन्माची आठवण मिळते. हे जे आहे त्याची मेख सद्गुरु कृपेनेच सापडते. ©️

You cannot copy content of this page