Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

जपतप, खटपट करून ज्ञान मिळविता येईल काय? ©️

जपतप, खटपट करून ज्ञान मिळविता येईल काय? ©️

श्री समर्थ मालिक – जपतप खटपट केलीस काही | ज्ञानावाचून मुक्ती नाही || ज्ञान पाहिजे जरी सत्य | तरी करी तू नित्य योग्य हे पथ्य ||

ज्ञान म्हणजेच प्रकाश ! संतांचे ज्ञान पोथी पुराणे वाचून आलेले नाही. हे संत आहेत काय? टाळ वाजवून कितीजणांनी हे मिळविलेले आहे? जगाच्या जननी पुढे कीर्ती चालली आहे. केवढे जपतप करताहेत? जप कोणाचे? प्रकाश कोणाचा? याची गती तरी आहे काय? किर्ती, जपतप करून तरी मिळू शकली आहे काय? पहावयास गेले,‌ घ्यावयास गेले तरी घेता येत नाही. काही संतांनी घेतले, ते घेऊन गेले.

खटपट, खटाटोप मानवाचा असतो ! खटाटोप संत नाही करत, अन् जर कराल तर तुम्ही मुक्ती मोक्षाला जाल काय? हे करत आहे, ते करत आहे असे काही मानव आहेत. या दरबार मध्ये सेवेकरी आहेत, पण करून घेणारे कोण आहेत? असे तत्व जोपर्यंत अशा मानवाला कळले नाही, तोपर्यंत जप तपाचा काही उपयोग नाही.

विशेष ! आसनाच्या सेवेकऱ्यांना तरी जप तप कळले आहेत काय? कसले ज्ञान पाहिजे? मानवाने मानवता ओळखली नाही तर पुढे काय? ज्यांना अखंड नाम पाजले आहे, त्यांचे पुढे काय? असे हे तत्व आहे. त्याच नामाचा जप अन् तप अन् त्याचीच खटपट तन्मयतेणे करणे. तसेच लिनता, नम्रता आणि शांती यांचा त्रिवेणी संगम हेच मोठे ज्ञान आहे. ज्ञानाचा प्रकाश आहे. ©️

You cannot copy content of this page