Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

अखंड तत्व कोठे आहे…©️

अखंड तत्व कोठे आहे…©️

श्री समर्थ मालिक – अखंड तत्व कोठे आहे? त्याचा वावर कोठे आहे? हे आपणाला कळलेच असेल. सेवेकऱ्यांनो ठाम श्रद्धा, अढळ विश्वास, दृढ: निश्चय असल्यास सर्वस्व होते. डळमळीत असल्यास काहिही होणार नाही. म्हणून ठाम व अखंड श्रद्धा ठेवा. वाट भुलता कामाची नाही. हे सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे. त्या ठिकाणी काहींची मनोभावना आहे, पूर्वी होते पण आता काही नाही. पण या ठिकाणी हे ठाम आहेत. याची कल्पना इतर मानवांना नाही. आजच्या या बोलावरून काय आहे ते पहा अन् त्याप्रमाणे वाटचाल करा. भुलू नका. शंका धरू नका. सत् भक्तीला ऋध्दी सिद्धी, तंत्र मंत्र काही लागत नाही. जादूटोण्याची आवश्यकता नाही. आले आले अन् गेले गेले हे सत् भक्तीत नाही. नजरबंदीचे खेळ नाहीत. अघोर मानवाच्या कर्तव्याचे फळ अस्थिर असते. तेच त्यांना मिळते. पुढे काय करायचे ते व्यापक शक्तीच करते. ते मानवांच्या हातात नाही.

सेवेकऱ्यांनो, हे तुमचे अखंड नाम अमृता सारखे आहे, ते टिकविण्याचा प्रयत्न करा. हेच माझे संदेश आहेत. पूर्वीप्रमाणे आता कस नाही. अहंकार हा आज ना उद्या मला खतम करावाच लागतो. क्रोधाला मारावयाचे, एका क्षणात मारू शकतो, पण त्याच्या पायऱ्या आहेत. मानव अहंकाराने बरबटला तर तोच अहंकार त्याला मृत्यूच्या खाईत लोटतो. लोटला जातो. ते कसे होते, तर करून घ्यावे लागते. करून घेतल्यानंतर तो आपोआप त्याखाईत लोटला जातो. ©️

You cannot copy content of this page