Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

दृश्य आहे तेच अदृश्य आहे…©️

दृश्य आहे तेच अदृश्य आहे…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी आहेत. सेवेकऱ्यास ज्ञानाप्रमाणे कुठे घालवायचे व ठेवावयाचे, त्याचे ज्ञान पाहिजे आहे अशी सेवेकर्‍यांनी अपेक्षा करू नये. कोण देतो अन् कोण घेतो ? ज्यांना ज्यांच्याकडून अखंड तत्व मिळाले आहे, त्यांचे आदेश, त्यांचे संदेश त्यांनी मानले आहेत काय?

आम्ही मानव आहोत. कर्तव्य करीत आहोत. पण प्रत्यक्षात या दरबार मध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांच्या महान महान चुका होत आहेत, पण कुणाला फेकले आहे काय? टाकले आहे काय?

अखंड तत्व अखंड आहे. दृश्य आहे तेच अदृश्य देखील आहे आणि ते कर्तव्य करीत आहे. सेवेकरी म्हणतो, मी कर्तव्य करीत आहे. पण या मानवाची कृती केव्हा ना केव्हा तरी बाहेर पडणार आहे. आपल्या कर्तव्यात राहणे. दयाघन माऊली आहे.

तुम्ही मानव काय करू शकता? काळ समिप आलेला आहे. सेवेकर्‍यांनी कर्तव्यात राहणे. त्राही त्राही होण्याची वेळ आलेली आहे. हे संदेश निदान सेवेकर्‍यांना आहेत.

लपवाछपवी, दडवा दडवी करू नये. ते तुमचे जप आहे. जे सर्वस्व तुम्ही टाकले आहे, तर का निवेदन देऊ नये? कुठली ज्योत जर चुकली असेल तर निवेदन का देऊ नये? सेवेकर्‍याच्या मस्तकावर हात टाकल्यानंतर सेवेकरी कुठे गेला होता? जप तप करावयास सद्गुरु ध्यान, सद्गुरु नाम यापरते अधिक काही नाही असे का सांगितले आहे? हेच ते ज्ञान ! त्यांच्या कृतीप्रमाणे घडत आहे. घडून गेले आहे. ते आता दिसत आहे. नाराजी कोणी पत्करायची नाही. ©️

You cannot copy content of this page