*गजेंद्र मोक्ष* या नावासंदर्भातील कथा प्रसिद्ध आहे.
हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ भागवत पुराणातील ८ व्या स्कंधातील हि एक पौराणिक आख्यायिका आहे.
गजेंद्रचा मागील जन्म -
गजेंद्र - त्याच्या मागील जन्मात, इंद्रद्युम्न नावाचा महान राजा होता. जो विष्णू भक्त होता. एके दिवशी, अगस्त्य ऋषी, या राजाला भेटायला येतात. परंतु राजा इंद्रद्युम्न (गजेंद्र), त्याला भेटायला आलेल्या…
श्री प्रभू रामचंद्र म्हणतात, "या दरबारात किती वेळा येणे झाले आहे. महाराष्ट्र भूमी बद्दल पुढे ते म्हणतात, "कोपिष्ट मुनींच्या (विश्वामित्रांच्या) शापाने ग्रासलेली व शापदग्ध झालेली आपली ही भूमी आहे. आपल्या ह्या महाराष्ट्र भूमीला मुक्त करण्याचे महान कार्य या दरबारात सुरू झालेले आहे आणि आता ते सफलही होत आहे, हे पाहून आनंद होत आहे. या कार्यामुळे…
समर्थांचे समर्थ फार निराळे आहेत. लाखों समर्थ निर्माण करण्याची त्यांची ताकद आहे. त्यांची शक्ती आम्हाला कशी अजमावता येईल?
ते राम फार निराळे आहेत. तेच समर्थांचे समर्थ होय. या दासाला क्षमत्व असावे. समर्थ कोणाचे समर्थ? हे समजत नाही. या आसनाचे समर्थ फार निराळे आहेत. परंतु फार दयाघन आहेत. त्यांच्या अमोघ शक्तीचे मोजमाप कोण करणार? त्यांचा अंत…
चौकट मुनी - भक्ती करून घेणारे फार निराळे आहेत आणि कशासाठी भक्ती?
जो मानव सत् पाहण्यासाठी तत्पर झाला आहे, तो काहीही होवो, केव्हाही मागे पुढे पाहणार नाही. ज्याची जितकी उत्कंठा झाली असेल, त्याची ती इच्छा सफल होण्यासाठी, त्याला कशाचेही भान रहात नाही आणि ती सफल झाल्यानंतर…
चौकट मुनी - म्हणजेच अगस्त्य किंवा अगस्ती मुनी ! ते म्हणतात, "ज्या अमुल्य क्षणांची मी वाट पहात होतो, तो क्षण आज मला लाभला. धन्य झालो."
दोन हजार वर्षांपूर्वी कुपीच्या डोंगराच्या पायथ्याशी, एक गुहा आहे, त्या ठिकाणी एका वृक्षाखाली ध्यानस्थ असताना, सद्गुरु माऊलींचे एकदा दर्शन लाभले. त्यावेळेला दिलेल्या आदेशाला आज पूर्तता आली.
(वालावल व चेंदवण या…
सद्गुरु पदाचा महिमा अगाध आहे. ज्याला जे दिले, त्याचा तो अमृततुल्य ठेवा कोणीही हिरावून घेणार नाही. सेवेकरी आपल्या कृतीस क्षणीक चुकत असेल, तर ती ठेव कृतीप्रमाने कमी कमी होत जाते.
ज्याप्रमाणे अकार, उकार, ओंकार याची कोणतीही स्थिती रहात नाही, त्याप्रमाणे तो आपण स्वतःकडून सद्गुरु चरणांवर अर्पण करतो.
सद् भावनेने, सत् आचरणाने जो सद्गुरू ठेवा जतन…
गोवर्धन ऋषी -
जो तेजोमय चैतन्याचा गाभा, तो आज पूर्णत्वाने मिळाला. आतापर्यंतची कृती कर्तव्य, त्याचे फळ प्रत्यक्ष अनुभवायास मिळाले. ध्यानस्थ स्थितीत संकट ओढवले असताना, त्याची यत्किंचितही जाणीव न देता, त्याच स्थितीत ठेवले.
कोणते असे तत्व श्रेष्ठ होते की, त्या तत्वासाठी अहोरात्र टाहो फोडीत होतो, ते मिळाले नाही. परंतु आज प्रत्यक्षात मिळाले.
सद्गुरु नाम आणि ध्यान…
स्वाभिमान आणि अभिमान - स्वाभिमान आणि अभिमान याचा अर्थ एकच आहे. भक्ती करताना स्वाभिमान आणि अभिमान याने पूर्णपणे रहित होऊन भक्ती मार्गास लागणे. त्यानंतरच पुढच्या पायरीची जाणीव होईल. स्वाभिमान आणि अभिमान या जाळ्यात गुरफटल्या नंतर भक्ती ही काय चीज आहे, याची जाणीव होणे अशक्य आहे. भक्ती करताना…
प्रत्येक सेवेकऱ्याने ध्यानात घेऊन सदगुरु चरणांचा लाभ घेत घेत आपणाला कोणत्या ठिकाणी जावयाचे ते लक्षात ठेवणे.
देव मुर्तीत नाही. तो हृदयात आहे. तो पाहण्यासाठी, त्याचा ठाव घेण्यासाठी अंत:करणाची शुद्धता हीच खरी भक्ती ! अशा तऱ्हेने भक्ती युक्त अंत:करणाने लुब्ध झाला त्याला पांडुरंग दूर नाही. तर तो जवळ आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताने भक्तियुक्त अंत:करणाने त्याच्या जवळ जावयास हवे. असे भक्तीचे रुप आहे. त्याला पहण्यासाठी…
भक्ती किती साधीसुधी गोष्ट आहे. भक्तिमार्ग हा राजमार्ग आहे. हा राजमार्ग कोणाप्रत जावयाचा आहे, याचा शोध प्रत्येक भक्ताने करावयाचा आहे. या राजमार्गाच्या योगानें मनाची भूमी शुद्ध व सात्विक होते आणि संतांचे, सत्याचे व सात्विकतेचे वळण मनाच्या ठिकाणीं निर्माण होते. ज्यावेळी शुद्घ सात्विकता निर्माण होते, त्यावेळी आपले परमेश्वर आपल्या प्रबळ इच्छा व भावना तृप्त करतात.
कोणता…
आपणाला ज्ञान केव्हां मिळत नाही?
आपणाला ज्ञान नेहमी मिळते. काहीना ज्ञान आहे. काहीना गती माहिती नाही. ते ज्ञान आता देत आहे. पूर्णपणे पाहून घ्या. काही कसर करू नका. आता, ज्ञान नाही, त्यांना ज्ञान देण्यात येत आहे. दोन्ही हातांनी आपणाला ज्ञान देण्यात येईल. पाहणारे ते आपण पाहू शकता. …