Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

कल्पतरू तळवटी बैसला…©️

कल्पतरू तळवटी बैसला…©️

ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे, राजाची कांता दारोदारी भीक मागत फिरेल का? तिच्या मनाजोगी सिद्धी पावेल की नाही? का तो राजा भिक्षांदेही असतो? पण कल्पतरू तळवटी बसल्यानंतर, त्याची भावना कुठे कुठे जाते?

कल्पतरू तळवटी….. दोन मार्ग आहेत. जो सत् कल्पवृक्षाखाली बसला, तो सत मार्गाने जाणारा असतो. जो अघोर, कल्पवृक्षाखाली बसला, तो अघोर कल्पनेच्या पाठीमागे लागून हैवान बनतो. मग तो स्वयं तत्वापर्यंत पोहोचू शकेल का? पोहोचू शकणार नाही.

कल्प, कल्पना, स्वयम अन् पर म्हटल्यानंतर तुझे माझे निर्माण झालेच की नाही? म्हणून आपणाला जे साधे सोपे सुलभ आहे तोच मार्ग अवलंबन करावयाचा आहे. भयावह म्हणजे भटकतो आहे, यात काय आहे, त्यात काय आहे अशी भावना. तेव्हा जी ज्योत अशी भटकते ती सतात निमग्न होईल का?

जो सत आहे, ज्याला सताचा प्रकाश आहे, तो स्वयं तत्त्वाच्याच पाठीमागे असतो. स्वयं तत्व दिलदार आहे. पण पर जे आहे ते पळ काढतेच की नाही? या ठिकाणी आसनाच्या सानिध्यात त्याला घेतले का? तर नाही. या ठिकाणी अघोराला थारा नाही. मात्र आसना सानिध्यात आहेत त्यांनी आपल्या मार्गाची चाकोरी ढळू देऊ नये. जर ढळली तर त्याच्यासारखा अभागी तोच ! (समाप्त) ©️

You cannot copy content of this page