Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मनभावन दर्शन…! ©️

मनभावन दर्शन…! ©️

या विश्वाची घडण कशी आहे? विश्व म्हणजे तरी काय? हे विश्व बीजरुपी आहे का बिजारहित आहे?आकाराच्या रहित जे दर्शन मिळते ते आपणाला पाहिजे आहे का? त्यात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मात्र ते बीज आहे की काय आहे याचे भान रहात नाही.

मसुरेप्रमाणे मोतीयाचे परी | असे दर्शने द्वारी……| बीज दाता मीच आहे, असे म्हटले आहे. मी बीज दाता असलो, तरी बीज स्वरूप आहे अन् त्याच्याही निराळा आहे. जशी सेवेकर्‍याची पाहण्याची ताकद तसे त्याला दर्शन !

काही सेवेकऱ्यांना अनुभव आहे, काही सेवेकरी दर्शन युक्त आहेत. काही सेवेकर्‍यांनी अंड्यासारखा शुभ्र आकार असेही दर्शन घेतले आहे. ठराविकच रूपात आहे असे मी सांगू शकणार नाही. म्हणूनच म्हटले आहे, बीज नसता अंडे झाले | तेथे जे योगी रमले….. काही सेवेकऱ्यांनी अनुभवले आहे. म्हणूनच सांगितले आहे, ज्या तऱ्हेने मला पाहाल त्या तऱ्हेने मी आहे. जशी भावना तसे दर्शन ! भावना रहित असले तरी दर्शन होते.

सद्गुरु चरणात रममाण होत गेल्यानंतर त्याच्या इच्छेप्रमाणे दर्शन देतात. काही भक्तांनी असे वर्णन केले आहे, कोणी म्हणतात अंगुष्ठा प्रमाणे आहे, काही म्हणतात, मसुरेप्रमाणे आहे. आकाराला धरूनच ओंकार स्वरूपाची जाणीव मिळते. ©️

You cannot copy content of this page