Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सत् भक्तीचा प्रकाश – ©️

सत् भक्तीचा प्रकाश – ©️

सत् कोठे आहे? सद्गुरु म्हणजे काय? त्यांची ओळख करून घेणे, ओळखणे, मग तोच सत् भक्तीचा प्रकाश अन् त्याच प्रकाशाच्या अनुसंधनाने वाटचाल करणे. त्याच प्रकाशात सद्गुरु सर्व ठिकाणी फिरवून आणतात. त्या मार्गाने सेवेकरी जाईल, त्यावेळेला त्याला वाटेल हा सत् भक्तीचा प्रकाश आहे. पण कष्ट करून मिळाला तरच त्याला मोल आहे, किंमत आहे. पण सहजासहजी मिळाला तर त्याचे महत्त्व वाटत नाही. त्याला काय म्हणावे? म्हणून सेवेकर्‍यांनी सद्भक्तीच्या प्रकाशाने जाण्याचा प्रयत्न करणे, हे मानवी सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे.

सत् कोठे आहे, कशात आहे याचा आतापर्यंत क्वचितच मानवांनी शोध लावला आहे. बहुतेक मानव असेच भटकत आहेत. काही मानव सत् भक्तीत रममाण झाले असले तरी त्यांच्या मनाच्या कोलांट्या उड्या चालत असतात. म्हणून सत भक्तीने जाणारी, पथ्य सांभाळणारी ज्योत असेल, तर मग मात्र हाच सत् प्रकाश म्हणणे योग्य आहे. बोलता येते पण बोलापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. तो बोल कृतीत आणला पाहिजे. मग मात्र सत् भक्तीचा प्रकाश याला कोणीही लोपविणार नाही.

आज भक्तीचा प्रकाश इतर कोणालाही दिसणार नाही. ज्याला सापडला तो मात्र यात रममाण होतो. तेव्हा सत् भक्तीच्या प्रकाशाने वाटचाल करणे आद्य कर्तव्य आहे.

सत् भक्तीचा प्रकाश अन् सत् भक्तीने प्रकाश ! म्हणूनच त्याप्रमाणे वाटचाल करणे हे सेवेकऱ्याचेआद्य कर्तव्य आहे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page