Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

घडण घडविता…©️

घडण घडविता…©️

श्री समर्थ मालिक – या ठिकाणी ज्ञानच भरलेले आहे. घेणारा पाहिजे. ज्ञान साधे, सोपे, सुलभ तितकेच कठीण आहे. कठीण कोणाला अन् सुलभ कोणाला? करील त्याला सोपे आहे, न करील त्याला कठीण आहे.

मी ज्यावेळेला प्रत्यक्षात अवतार कार्य नटवले ते कोणत्या कारणाने घेतले? त्यावेळेला सेवेकरी, मानव, प्राण्यांना भयंकर त्रास होता. तिच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यावेळेला, एकच त्रास देणारा प्राणी होता तो म्हणजे राजा, पण आता ज्याच्या मनाला येईल तो राजा ! अशी परिस्थिती आहे. सगळा मनाचा कारभार चाललेला आहे हे मी जाणतो.

दुसरी गोष्ट, सत् भक्तीची स्थिती सत होते का असत होते हे मी जाणतो. तद्वतच थोड्याच अवधीत जे घडवून घ्यावयाचे ते घडवून घेणार आहे. याच्यात अघोरांना खो घातल्याशिवाय आग लागणार नाही. अघोरांना खो घातल्याशिवाय, चवताळविल्या शिवाय त्यांचा नाश होणार नाही. यासाठी युक्ती, प्रयुक्ती करावयास पाहिजे. अन् तिच कारवाई आता चालू आहे. आपले व सेवेकऱ्यांचे प्रणव माझ्या कानी येतात. कारण सेवेकरी किंवा आपले बोलणे चालते. एकमेकांची खूण एकमेकांना कळते. ज्याला गती नाही त्याला कळणार नाही. ©️

You cannot copy content of this page