श्री विठ्ठल - सर्व ठिकाणी व्यापक असणारे तत्व, त्याचा अंत नाही. आम्हा सारख्यांना काही अधिकार बहाल करून कर्तव्यासाठी पाठविले आहे अन् त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्य प्रवीण असतो.
सत् हे सामान्य तत्व नाही. सहज बोलतील. सहज बोलणे हाची उपदेश, पण घेईल त्याला. मग त्याला काही एक कमी पडणार नाही. न घेईल तो रिकामा घडाच समजा. …
श्री समर्थ मालिक - सगुण निर्गुण आहे कसे अन् नाही कसे?
जड आहे. स्थूल देह म्हणजे त्याला मानव म्हटले आहे. प्रकृती स्वयं आहे का? तर नाही. मी सगुण आहे, निर्गुण पण आहे. पण कोणाला? जो जाणेल त्याला. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही.
आपल्या नादात गुंग असते ते कोण? जोपर्यंत भिन्नत्व नाही, तोपर्यंतच एकरूप असते,…
हिमालयात बसवले तेव्हा भगवी वस्त्रे होती. म्हणून हे कर्तव्य इतरांकडून होणार नाही. त्यामुळे हिमालयातून कोकणात पाठविले. आपण मला ओळखले, मी तुम्हाला ओळखले ! यातील सेवेकर्यांची तितकी पात्रता नाही. यांच्याकडून टोलवा टोलवी ही होणारच. ही अशी तऱ्हा आहेच. या मानवी सेवेकर्यांची तितकी पात्रता नाही. सेवेकरी असे बनले तर आपणाला त्रास होणार नाही.
परब्रम्ह तत्व आपल्या…
आता ॐ कार म्हणजे काय? कुठून आले? कोणी निर्मिती केली? तर...
अखंड तत्व (निराकार), तेथून धूनधूनकार, अन् त्यापासून ॐ कार निर्माण झाला. तोच ओंकार आकार हा ओंकार स्वरूप झाला, मग प्रश्नच उरत नाही. मग तत्वासमान झाले.
प्रकृती आणि तत्व भिन्न आहे असे मानले तर ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. तत्व आणि प्रकृती…
श्री समर्थ मालिक - यश ही अवश्य आहे. पण कधी कधी सत् सेवेकऱ्याला असताचे चटके बसतात. त्याला असताचे चटके बसून बसून यश हे आपोआप निर्माण होते. मात्र त्याला हे कळत नाही कि हे यश कशापासून मिळाले. हर्षयुक्त झाला की त्याला वाटते हे मीच करतो. पण यश आल्यानंतरच त्याची हर्षयुक्त भावना असते. पण जोपर्यंत कर्तव्य होत…
श्री नामदेव महाराज - जगात काय श्रेष्ठ आहे? देव, दानव की आणखी काही श्रेष्ठ आहे हे भक्तगणांनी ओळखायला पाहिजे. भक्तीचे मूळ ज्यांना सापडले, त्याने मात्र ते कदापीही सोडू नये. चमत्काराच्या आधीन जाऊ नये. भक्ती ही चमत्कार रहित आहे. भक्ती करणे हे मानवांचे आद्य कर्तव्य आहे. भक्तीचे मूळ ज्या ठिकाणापासून मिळाले, ते ठिकाण सोडू नये. …
श्री नामदेव महाराज - दुसरी गोष्ट, रुधिरात रक्ताचे मंथन करून शुभ्र दुध केले आहे. कोणाला दुधाची, तर कोणाला ताकाची चव असते. ताक हे ही सर्वस्व शुभ्र आहे. दुधाला विरजण घातले की दही होते. त्याला आंबट वास येतो. त्याची घुसळण केले की ताक बनते अन् लोणी वर येते. ते पण शुभ्रच असते. आता या तिन्ही वस्तूंचा…
श्री संत नामदेव महाराज - ज्याने या सर्वस्व ब्रह्मांडाची रचना केली, आकाश, पृथ्वी, सर्वस्व सृष्टीची रचना केली, ते तत्व आमच्या सारख्या अज्ञानी सेवेकऱ्यांना म्हणतात, “काहीतरी सांगा.” पण मी काय सांगावे?
आज या अज्ञानी, अडाणी सेवेकऱ्याची कशी काय आठवण झाली? आज महान भाग्य म्हणजे, सता आपले दर्शन मिळावे ही इच्छा आहे.
अनंत लाघवी तत्व,…
आकार पूर्ण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय अधिकार वाणी निर्माण होणार नाही. अन् ती निर्माण झाल्यानंतरच गती मिळते कि मी कोणाला शरण आहे. ते तत्व कोण आहे? ही सर्वस्व गती मिळते ती कशी? “प्रत्यक्ष आकाराला स्थूल देही दर्शन मिळते. पण केव्हा आणि कधी? जोपर्यंत ज्ञान दृष्टीने पाहता येत नाही, मग प्राकृत दृष्टीने काय पाहणार? म्हणून प्रत्यक्षात…
गीतेत म्हटले आहे, “मन्नाथो श्री जगन्नाथो | मद् गुरु श्री जगद्गुरु || सर्वात्मा सर्व भूतात्मा | तस्मै श्री गुरुवे नमः || मग माझा वेगळा, त्याचा वेगळा असे होईल का? प्रकृती वेगळी असल्याकारणाने विशेष काही वाटते, म्हणून आकार निरनिराळा आहे आणि आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो.
मानवांना हे समजत नाही. पण बोल आणि प्रणव कोणत्या…
श्री समर्थ मालिक - भक्त हा भगवंतावर अन् भगवंत हे भक्तावर अवलंबून असतात. भक्ती प्रेम निर्माण झाले की मनाची चंचलता आपोआप दूर होते. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण वाटते. मन शुद्ध झाले की भक्तीत कठीणता नाही.
सर्वभूतेषु एकच तत्व आहे, पण अनंत रूपे अनंत नामे याने नटलेली महामाया ही नटविली कोणी?…
श्री समर्थ मालिक - आचार विचार सोडलेल्या मानवांसाठी पूर्ण विचार करावा लागतो. भरपाई झाल्याशिवाय हात घालता येत नाही. एकच, भक्तगणांनी धीर सोडू नये. आज कालचा हा काळ नाही. पूर्वीपासून हे चालत आलेले आहे. सत भक्ताला असताचा त्रास होतो. सेवेकरी त्यातून तापून कसून निघाल्यानंतर पूर्ण प्रकाशित होतो, पण त्याला कळत नाही. मातलेले अघोर त्या ठिकाणी शरण…