गीतेत म्हटले आहे, “मन्नाथो श्री जगन्नाथो | मद् गुरु श्री जगद्गुरु || सर्वात्मा सर्व भूतात्मा | तस्मै श्री गुरुवे नमः || मग माझा वेगळा, त्याचा वेगळा असे होईल का? प्रकृती वेगळी असल्याकारणाने विशेष काही वाटते, म्हणून आकार निरनिराळा आहे आणि आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो.
मानवांना हे समजत नाही. पण बोल आणि प्रणव कोणत्या तऱ्हेत येतात? हे कसे काय आहे, हे जाणणारे जाणतात. ज्याच्या संचितात आहे, तोच घेऊ शकतो. ज्याच्या संचितात नाही तो त्यात रमणार नाही. जी प्रकृती मायेच्या आधीन बनली त्याला त्याच तऱ्हेने वाट दाखवावी लागते. ज्याला सताची आपुलकी आहे, त्याला त्याच तऱ्हेने वाट दाखवतात. इतकेच, सर्वस्व मोक्षापर्यंत दाखविण्याचे सामर्थ्य आकारातच आहे. ज्याच्याजवळ साध्य नाही, सामर्थ्य नाही, तो सेवेकर्याला काय दाखविणार? ©️
