आता ॐ कार म्हणजे काय? कुठून आले? कोणी निर्मिती केली? तर…
अखंड तत्व (निराकार), तेथून धूनधूनकार, अन् त्यापासून ॐ कार निर्माण झाला. तोच ओंकार आकार हा ओंकार स्वरूप झाला, मग प्रश्नच उरत नाही. मग तत्वासमान झाले.
प्रकृती आणि तत्व भिन्न आहे असे मानले तर ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. तत्व आणि प्रकृती एक झाली तर तू आणि मी वेगळा नाही. पण आताचा काळ मायावी आहे, म्हणून ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे.
आसनाधिस्तांना मी काही अनुग्रह दिला नाही. फक्त माझा स्पर्श झाला आहे. आपण धावा केला म्हणून यावे लागले. पण सेवेकर्याचे कोडकौतुक पुरवले की नाही? सत् आहे नां? पण काही कर्तव्यामुळे सेवेकऱ्याचे अन माझे बोलताना वाकडे आले. त्यामुळे अकरा वर्षे माझे नाव गोष्ट नाही. फक्त आसनावर माझ्या आकाराची छबी आहे, पण तत्वाचे अन् सेवेकऱ्याचे खटकले होते कि नाही? कर्तव्यावरूनच ना? ज्या वेळेला अखंड तत्वाने संदेश सोडले, ॐ कारेश्वराला बोलवा, चैतन्य उडवले होते अन् त्या वेळेला मातेचा धावा केला, तिथपासून आठवण नाही. मी फक्त तसबिरीतच आहे का? म्हणून सेवेकरी कसा आहे, कसा नाही हे मी ओळखले आणि म्हणूनच पूर्व जन्मीचे सत् कृत्य अखंड होते म्हणून हिमालयात बसवले. ©️
