Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

जगात काय श्रेष्ठ आहे? ©️

जगात काय श्रेष्ठ आहे? ©️

श्री नामदेव महाराज – जगात काय श्रेष्ठ आहे? देव, दानव की आणखी काही श्रेष्ठ आहे हे भक्तगणांनी ओळखायला पाहिजे. भक्तीचे मूळ ज्यांना सापडले, त्याने मात्र ते कदापीही सोडू नये. चमत्काराच्या आधीन जाऊ नये. भक्ती ही चमत्कार रहित आहे. भक्ती करणे हे मानवांचे आद्य कर्तव्य आहे. भक्तीचे मूळ ज्या ठिकाणापासून मिळाले, ते ठिकाण सोडू नये.

आम्ही अज्ञानाने विठ्ठलाना मानीत होतो. पण माझ्या सद्गुरूंनी प्रत्यक्षात सर्वस्वाची गती देऊन दाखविले. ते सर्वस्वाचे निधान आहेत. स्वयमेव भरलेले तत्त्व सर्वस्व ठिकाणी कसे भरलेले आहे, कसे वावरत आहे हे त्यांनी दाखविले. मी त्यांचे चरण कधीही सोडले नाहीत. आम्ही जी कर्तव्यें केलीत, ती त्यांच्याच कृपेने केलीत.

माझे सर्वस्व म्हणजे खेचर स्वामी हेच होते. स्वामी म्हणजे काय? स्वयमेव तत्व आहे तेच स्वामी ! तेच अखंड पद ! त्यालाच आम्ही सर्वस्व म्हणतो, सर्वज्ञ म्हणतो. जसा भक्त, तसे ते ! जशी भावना, त्याप्रमाणे दर्शन मिळते.

भक्तीचे मूळ न कळल्यामुळे मानवात वाद निर्माण होतो. याला भक्ती म्हटलेले नाही. अहंकार सर्वांना आहे. पण तो कसा? रामाला अहंकार होता आणि रावणाला देखील अहंकार होता. पण दोघांच्या अहंकारामध्ये फरक होता. रामाच्या अहंकारामध्ये सात्विकता होती, तर रावणाच्या अहंकारामध्ये दांभिकता, असात्विकता होती. म्हणून अहंकार सात्विकतेने नटलेला असावा. सद्गुरुं विषयी अहंकार बाळगा, पण तो कसा तर सात्विक अहंकार बाळगा ! ©️

You cannot copy content of this page