Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

जशी प्रकृतीची पात्रता, त्याप्रमाणे घडण घडत असते…©️

जशी प्रकृतीची पात्रता, त्याप्रमाणे घडण घडत असते…©️

श्री नामदेव महाराज – दुसरी गोष्ट, रुधिरात रक्ताचे मंथन करून शुभ्र दुध केले आहे. कोणाला दुधाची, तर कोणाला ताकाची चव असते. ताक हे ही सर्वस्व शुभ्र आहे. दुधाला विरजण घातले की दही होते. त्याला आंबट वास येतो. त्याची घुसळण केले की ताक बनते अन् लोणी वर येते. ते पण शुभ्रच असते. आता या तिन्ही वस्तूंचा कधी सुगंध सुटला आहे का हो?

तद्नंतर तेच लोणी एखाद्या भांड्यात घालून अग्निवर ठेवले की मग सुगंध सुटतो तो कुणी पकडला आहे का? असे जे सत आहे, ते सुगंध युक्त आहे. ते कोणाला सापडले आहे का? जे त्या ठिकाणी लयबद्ध झाले, ते परत आले नाहीत. म्हणून सद्गुरु हे सर्वस्वाचे निधान आहे. ते वाटेल त्या तऱ्हेने कस घेतील. पण सेवेकऱ्याला वाया घालविणार नाहीत. अत्यंत दयाघन असे ते तत्व आहे. त्यांच्या लिलेचा अंत नाही. ज्यांना ते सापडत नसेल, त्याने सुगंधात तरी निमग्न होण्याचा प्रयत्न करणे ही विनंती आहे.

क्षणात निराकारी बनतील, क्षणात आकार धारण करतील. सदोदित स्थानवंत असे हे तत्व आहे. असे असून सुद्धा, निर्गुण निराकार पदानेही ते व्यवहार करतात. माझ्यासारख्या सेवेकऱ्याने त्यांचे आणखी किती वर्णन करावे? म्हणून येथील सेवेकरी महान भाग्यवान आहेत. कोणी सद्गुरूंचा अंत लावला आहे का? कोणी म्हणतो आम्हाला दर्शन नाही, कोणी म्हणतो प्रकाश नाही. येथील सर्वस्व सेवेकर्‍यांना दर्शन मिळालेले आहे. सत् हे अगाध लिलाधारी आहेत. ते कुठेही दर्शन देतील, पण हे सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे. जशी प्रकृतीची पात्रता, त्याप्रमाणे घडण घडत असते. ©️

You cannot copy content of this page