Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

आकार ते निराकार…!©️

आकार ते निराकार…!©️

आकार लय केव्हा होतो? त्यात रममाण झाल्यानंतर आकार राहतो का? असे सेवेकरी केव्हा बनणार? सेवेकऱ्यांना सांगायला लाज वाटते का? अशी अखंड तिजोरी बहाल केली असताना सुद्धा आसनाधीस्तांनी सांगितले की मी नामातीत आहे. म्हणूनच सेवेकर्‍यांनो खजिना लुटा. सेवेकर्‍यांनो हे द्वार तुम्हाला मोकळे आहे. याला लुटणारा पाहिजे.

अजून सेवेकऱ्यांचे हेवे-दावे गेलेले नाहीत. मी आणि तू रहित सेवेकरी झाल्याशिवाय ॐ कार स्वरूपी लीन होऊ शकेल का तो?

इतकेच सांगावयाचे, सेवेकर्‍यांनी निष्काम होण्याचा प्रयत्न करा. सेवेकरी सकाम आहेत हे मी जाणतो. सेवेकऱ्यांना काय पाहिजे हे मला माहित आहे. सेवेकरी सकाम बनल्याशिवाय कोणतीही कृती घडणार नाही का?

या आदेशाप्रमाणे आसनाधीस्तानी आपणास जे कळविले त्याप्रमाणे वाटचाल करणे. हे संदेश आहेत. मी इतकेच सांगतो की, मी म्हणाल तसा आहे. आकारी बनणे न बनणे तो माझा अधिकार आहे. सेवेकरी कुठे काय करतो, हे मला कळत नाही म्हणा, मग मी कसा सांगणार?

म्हणूनच सेवेकर्‍यांनो आपण कुठे आहात, कोणाचे सेवेकरी बनलो आहोत, आपणाला कोणती संपत्ती बहाल केली आहे, कोणते तत्व बहाल केले आहे, याची जाणीव ठेवून कृतिमान होणे हेच संदेश द्यावेसे वाटतात. न पेक्षा बोलणे उच्च दर्जाचे अन् कृती मात्र शून्य असे नसावे. याप्रमाणे कृतिमान होणे हे संदेश आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page