Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

भूमी शुद्ध होणार…! ©️

भूमी शुद्ध होणार…! ©️

आजचे दिवस हे फार अहंकारात चाललेले आहेत, अन् या अहंकारावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र भूमी शापातून मुक्त करावयाची आहे. तेव्हा ही घुसळण झाल्याशिवाय भूमी शुद्ध होणार नाही. ही घुसळण करणारच हे मात्र सेवेकर्‍यांनी विसरता कामा नये.

दुसरी गोष्ट, असे होणार, तसे होणार हे म्हणणे साफ चुकीचे आहे. पांडवांसारखे जीव:श्च कंठ:श्च दुसरे कोणी नव्हते. त्यांच्यासारख्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झळ लागली नां? ती त्यांनी सहन केली नां? त्यानंतर कौरवांचा नाश करण्यात आला. हे का? कौरव पांडव हे नातलगतच होते. कौरवांची बुद्धी सात्विक का झाली नाही? का होऊ शकली नाही?

ज्यांची कृती सात्विक असेल तेच सात्विक होतील. कौरवांची भावना शुद्ध नव्हती म्हणून वृत्ती पालट झाली नाही. अहंकाराने बरबटलेल्या त्या ज्योती होत्या. त्यांना वाटत होते की आम्ही कोणीतरी विशेष आहोत. त्यांना माझी गती का मिळू नये? कारण ती पात्रता कौरवांजवळ नव्हती. त्यांचे समत्व बुद्धीने मिटले असते, तर मला मध्ये पडावे लागले नसते, पण पांडवाना काही द्यावयाचे नाही असे त्यांनी ठरविले होते.

सत भक्तीने चाललेले असताना त्यांना काहीच द्यावयाचे नाही असे त्यांनी म्हटल्यानंतर मी पांडवांची बाजू उचलून धरली, पण भक्त त्या पात्रतेचे पाहिजेत. पृथ्वी सर्वस्व धगधगली आहे. तिच्या डोईवरचा भार कमी केलाच पाहिजे अन् तो करावयास हवा. काळ जवळ जवळ येत आहे. ही गदा कोणावर फिरणार, हे मला आत्ताच सांगता येणार नाही आणि काही सांगण्याची आवश्यकताही नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page