Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

स्वधर्म अन् परधर्म म्हणजे काय? ©️

स्वधर्म अन् परधर्म म्हणजे काय? ©️

स्वधर्म म्हणजे काय? अन् परधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे जो सत पूर्ण आहे, ज्याच्या मुखावर सताची झलक असते, ज्याची सत कृती आहे, सत भक्तीत रममाण आहे, तोच खरा स्वधर्म होय. असा भक्त भिक्षां देई असा नसतो. त्याची इच्छा पूर्ण होते. तो स्वयं तत्वावर अवलंबून असतो. जो सत् मार्गाने जातो त्याला दुसरीकडे भिक्षा मागण्याची जरुरी नसते.

पर म्हणजे अंधार ! अहंकाराने बरबटलेली कृती ! परधर्म म्हणजे काय? येथे पर का म्हटले आहे? म्हणून पर म्हणजे चमत्कार, नमस्कार, ऋद्धी सिद्धी, तंत्र मंत्र हे आहे. याच्या आधीन बनल्यानंतर तो परक्यावरच अवलंबून असतो. अशा मानवाला स्वयं म्हणता येईल का? तो काय म्हणतो, मीच सर्वस्व आहे. कारण त्याच्याजवळ ऋद्धी सिद्धीचे गाठोडे असते. त्याचा अहंकार वाढत जातो. अहंकार वाढल्यानंतर मी कोणीतरी विशेष आहे अशी भावना होते. त्याचे हे गाठोडे काढून घेतले तर काय होईल? तंत्र-मंत्र कोणाच्या आधीन आहे? याला उत्पन्न करणारा कोणीतरी आहे ना?

पर म्हणजे या प्रपंचात अघोर भक्तीने बरबटून ऋद्धी सिद्धीच्या आधीन गेलेली अहंकार युक्त ज्योत ! अशा रीतीने अहंकार वाढल्यानंतर त्याला सुख सापडत नाही. त्याला वाटते मीच हे सर्वस्व करतो. पण स्वयं जे आहे ते असे म्हणणार नाही. मी करतो त्याची त्याला गती असते, जाणीव असते. करणारा मी कोणीही नाही. मी निमित्त मात्र आहे. स्वयं तत्त्वाचे पाठीमागे जाणारा तो केव्हाही प्रसंगात पडणार नाही. पडू देणार नाही. इतकेच, त्याची त्याला जाणीव देत नाहीत. गती देत नाहीत. स्वयमेव तत्व त्याला त्रासातून मुक्त करते. मग स्वधर्म श्रेष्ठ का परधर्म? जो सत् प्रवीण आहे, सत् पुत्र आहे, सत् भक्त आहे, त्याला कसलीही उणीव पडणार नाही. उणीव भासू देणार नाहीत.©️

You cannot copy content of this page