Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

धर्म – सत् व्याख्या !©️

धर्म – सत् व्याख्या !©️

स्वधर्म हे निधान आहे. धर्म म्हणजे कोणता धर्म? धर्माच्या व्याख्या दोन आहेत. धर्म म्हणजे मानव धर्म. मानव भिक्षुकाला धर्म देणार तो ही धर्म आणि तिसरा धर्म सत्कृतीने जाणे आणि पांडवांमध्ये धर्म होता तो ही (नाव) धर्म ! म्हणजे धर्म कोणता?

धर्म म्हणजे सत् धर्म ! याची तुलना एकाच चाकोरीतून जाते. मानव धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही. मानव धर्म संचिताप्रमाणे मिळतो. म्हणजेच तो मानवात फेकला जातो. चत्वार खाणीत फेकला तर काही करता येणार नाही. त्याला बोलता येत नाही.

तशाच आणखी योनी आहेत. त्यात सत् गती मिळणे कठीण आहे. मानव धर्मात सर्वस्व करता येते. सर्वस्व काही कळते. लोकांच्या तोंडातून त्याला कळते की जगात ईश्वर आहे. ईश तत्व आहे अन् त्याप्रमाणे मानव वाटचाल करू लागला म्हणजे मानव धर्माप्रमाणे त्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करतो. मग मानव धर्म श्रेष्ठ कि चत्वार खाणी श्रेष्ठ?

धर्म दीक्षा हा धर्म नव्हे. मानव सतधर्माने गेला, तरच धर्म ओळखला असे म्हणता येईल. मानव असून चत्वार खाणीप्रमाणे वागू लागला, तर त्याला मानवधर्म म्हणता येणार नाही. जगात मानव धर्म श्रेष्ठ आहे. (समाप्त)

You cannot copy content of this page