श्री समर्थ मालिक - अनेक वेळेला प्रवचने झालीत. गुरुबंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे. याचे वर्णन कोणालाही करता येत नाही. परलोकी सुद्धा याची ओळख होऊ शकते. पण हे सेवेकऱ्यांना घेता येत नाही. गुरुबंधूत्वाच्या नात्याची कितीही चिकित्सा करा, किती फरक पडतो याचा सेवेकर्यांनी विचार करा. हे नाते असताना एकमेकांना संशयी वृत्तीने, गटबाजीने पाहता म्हणजेच द्वैत भावनेने…
श्री समर्थ मालिक –तिर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || ज्या वेळेला तुकोबांनी हे बोल फेकले त्या वेळेला त्यांनी किती तीर्थे केली होती? काशी, गया, प्रयाग वगैरे त्यांनी तीर्थे केली का? मग तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी || आधीच मन मुंडा | मगच ब्रह्म धुंडा || ज्याने मन मुंडा केले नाही, त्याला…
श्री समर्थ मालिक - सर्व सेवेकरी पूर्व संचिताप्रमाणे या आसना सानिध्यात घेतले आहेत, मग हेवे दावे कशासाठी? याचा विचार तुम्ही करा. यानंतर मात्र हेवेदावे नकोत. आसनाधीस्त हे तत्त्व साधे सुधे नाही. ते कोणाकडून काहीही करून घेतील, ते कोणाला कळेल का? मग सेवेकऱ्यांचे मन गढूळ का? मनात शंका का? अन् कशासाठी? त्यांनी जे बीज पेरले ते…
श्री समर्थ मालिक - या नामावर श्रद्धा राहणे कठीण आहे. कोणी म्हणतो, ती हवा आहे. ती गेली म्हणजे सर्वस्व कारभार आटोपला, पण हवेत किती अर्थ आहे. त्यात किती सामर्थ्य आहे, हे पाहण्याचे मानवाचे सामर्थ्य नाही.
मानव हा मानाला हपापलेला आहे. क्रोधाने बरबटला आहे. मग, त्याला या नामाची गती कशी मिळणार? जो मानव अहंकाराने बरबटला, मी…
माझी भक्ती करा असे म्हणण्याची काहीही जरुरी नाही. पण जगी कायम टिकणारे कोण आहे? उत्पत्ती स्थिती लय स्थिती कशी होते? हे कोण करते? याची मानवाला जाणीव असावी लागते. म्हणूनच सृष्टीची रचना करावी लागली.
हा आज कालचा काळ नाही. कोणी सांगेल का पृथ्वी कधी निर्माण झाली? कोणी निर्माण केली? असे सांगण्याचे कोणाचेही सामर्थ्य नाही, म्हणून…
श्री समर्थ मालिक - हल्लीचा मानव कोठे भटकतो, त्याची मोजदाद नाही. जो अमृताहुनी गोड पदाला मिळाला, ज्याने रस चाखला, तो यात रममाण झाल्याशिवाय केव्हाही राहणार नाही. ज्याला रममाण करावयाचे त्यालाच रममाण केले जाते. ज्याला याची गोडी नाही, त्याला कदापिही घेणार नाही. गोडी लागू देणार नाही. जे सानिध्यात आहेत, ज्यांना एक तत्व पटले त्यांनी कोणीही हे…
सद्गुरूंच्या आदेशानुसार जी ज्योत वागेल, त्याचे कोटकल्याण होईल. पण श्रद्धा बलवत्तर असल्याशिवाय एक तत्त्व नाम आपली कधीही गती देणार नाही. म्हणून एकाच तत्वाने, एकच नामाने अनेकांचा उद्धार झालेला आहे. अनेक संतांनी त्याचा उहापोह, त्याचे लिखाण केले आहे, म्हणून ज्याला ज्याची खूण माहिती झाली तरच तो त्यात रममाण होईल. ज्याने हे सर्वस्वाचे निदान ओळखले, तोच ह्यात…
एक तत्व नाम म्हणजे काय? नाम एक आणि तत्व एक असे काही आहे का? तत्व तेच नाम ! नाम तेच तत्व !! तेच मनाला सांगावे दृढ धर.
हरी म्हणजे कोण? म्हणजे तेच हे ! हा म्हणजे तोच हरी, (आपल्या) हृदयी असणारा. तोच हृदयी असून, तोच सर्वत्र व्यापक आहे.
मी अखंड आहे. मी माझ्या…
श्री सद्गुरु बाबा – मानवी मनाची वृत्ती निर्भीड असेल तर तोच मानव मनावर ताबा ठेवू शकतो. वृत्ती ही त्रिकुटीच्या आधीन आहे. वृत्ती शुद्ध असेल तर कानाने ही शुद्ध ऐकाल. वृत्ती हीन असेल त्या ठिकाणी कधीही शुद्ध विचार येणार नाहीत. वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.
“सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. मन सूक्ष्माला सोडून नाही.”
मनाला…
गोरा कुंभार - खरे पाहिले तर भक्ती साधी सोपी आणि सरळ आहे, पण ती डोळे भरुन पाहता आली पाहिजे. इच्छा असली तर पाहिल. सत भावनेने वाटेला लागल्यानंतर पूर्व संचिताप्रमाणे मिळेल. नाहीतर कितीही ज्ञान सांगितले तरी त्याचा काही एक उपयोग नाही.
आताच्या काळात बोलणे फार, पण कृतीला कमी. काहीच दिसत नाही. या ठिकाणी काही माणसे…
सेवेकरी सद्गुरु चरणांचे सेवक आहेत. त्याबद्दल मनात वादळ निर्माण झाले म्हणजे मन हेलकावे खाते आणि सद्गुरुना विसरतो, अशा तऱ्हेने तो वाटचाल करतो. सद्गुरुना हे सगळे माहीत असते पण त्याची ते सेवेकऱ्यांना गती देत नाहीत. सद्गुरु कधीही सेवेकर्याला विसरत नाहीत.
जीवनात वादळ निर्माण झाले, तर सद्गुरूंची आठवण ठेवून नामात गुंग झाल्यास काळाचीही भीती नाही. सेवेकऱ्यांना…
भक्ती - भक्तीला वाद, तमाशा, डांगोरा पिटणे हे काहीही लागत नाही. भक्ती ही आपोआप आहे. ती जिव्हाळ्याची भक्ती आहे. भक्तीचा जिव्हाळा कशात आहे, हे जर ओळखले, तर त्याला सांगण्याची जरुरी नाही. ज्याने ओळखले, ज्याला पटले तो तिथून दूर जाणार नाही. अनेक अघोरांनी काही जरी सांगितले, तरी तो ऐकणार नाही. त्याला जरी दूर खेचण्याचा प्रयत्न केला,…