Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

एक तत्व – एक नाम ©️

एक तत्व – एक नाम ©️

एक तत्व नाम म्हणजे काय? नाम एक आणि तत्व एक असे काही आहे का? तत्व तेच नाम ! नाम तेच तत्व !! तेच मनाला सांगावे दृढ धर.

हरी म्हणजे कोण? म्हणजे तेच हे ! हा म्हणजे तोच हरी, (आपल्या) हृदयी असणारा. तोच हृदयी असून, तोच सर्वत्र व्यापक आहे.

मी अखंड आहे. मी माझ्या मुखाने सांगू शकत नाही. माझे वर्णन कोणीही केलेले नाही. कोणीही करणार नाही. एकाच तत्वाने, एकाच नामाने मनाला ठाम ठेवून, त्याच मार्गाने वाटचाल केली तर तो खरोखरच मोक्ष मुक्तीच्या रस्त्यावर पोहोचू शकतो. हक्काने वाटेकरी होतो. म्हणूनच ज्ञानेशाने म्हटले आहे, एक तत्व नाम दृढ धरी मना ! हरीसी करुणा येईल तुझी !!

हरी, तो मीच ! हा म्हणजे तो अखंड असणारा, हृदयी वास करणारा हरी होय. पण मानवाला गती नसल्याने श्रद्धा बसत नाही. म्हणून वेगळ्या रस्त्याने तो जातो. चमत्कार दाखविण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर कोणाला म्हणतात याची गती मानवाला नाही. मानव वा सेवेकरी एकाच तत्त्वाने चालला, त्यातच रममाण झाला, विश्वास, श्रद्धा पूर्णत्व ठेवली, तर पूर्णत्वाने गती मिळेल. तो गतिमान होईल. पण मानव ठाम मनाने राहिला, त्यातच रममाण होईल तर ! ©️

You cannot copy content of this page