Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

सेवक, सेवेकरी ©️

सेवक, सेवेकरी ©️

सेवेकरी सद्गुरु चरणांचे सेवक आहेत. त्याबद्दल मनात वादळ निर्माण झाले म्हणजे मन हेलकावे खाते आणि सद्गुरुना विसरतो, अशा तऱ्हेने तो वाटचाल करतो. सद्गुरुना हे सगळे माहीत असते पण त्याची ते सेवेकऱ्यांना गती देत नाहीत. सद्गुरु कधीही सेवेकर्‍याला विसरत नाहीत.

जीवनात वादळ निर्माण झाले, तर सद्गुरूंची आठवण ठेवून नामात गुंग झाल्यास काळाचीही भीती नाही. सेवेकऱ्यांना याचा अनुभव आहे. सेवेकर्‍यांनी विसरता कामा नये. प्रत्येकाच्या पाठीशी चित्घण शक्ती आहे. सेवेकरी तिन्ही अंगाने शरण असावयास पाहिजे. त्याने कशाचीही अपेक्षा करावयाची नाही. त्याला सर्वस्व मिळते. म्हणून सेवेकर्‍यांनी कष्टी होऊ नये. जे व्हावयाचे आहे ते होईल, त्याने कष्टी व्हावयाचे नाही.

जीवनात वादळ निर्माण झाले तर ते कष्टी होतात, परंतु सेवेकऱ्याने आडमार्गाने न जाता, राजमार्गाने जावे. सद्गुरु आपल्या सेवेकर्‍याला राज मार्गाने नेण्याची धडपड करतात. सेवेकर्‍यांनी आपल्या कर्तव्याप्रमाणे वाटचाल करणे. चित्घण शक्ती पाठीमागे आहे. सृष्टीच्या नियमाप्रमाणे जे व्हावयाचे आहे ते होईल. हे कालचक्राप्रमाणे सर्वस्व होत आहे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page