Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – हे मना तुझ्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल का सद्भावना निर्माण होत नाही? माझ्या सद्गुरूं बद्दल, हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

योगीयांची खूण योगी जाणे ! ©️

योगीयांची खूण योगी जाणे ! ©️

श्री समर्थ मालिक – या नामावर श्रद्धा राहणे कठीण आहे. कोणी म्हणतो, ती हवा आहे. ती गेली म्हणजे सर्वस्व कारभार आटोपला, पण हवेत किती अर्थ आहे. त्यात किती सामर्थ्य आहे, हे पाहण्याचे मानवाचे सामर्थ्य नाही.

मानव हा मानाला हपापलेला आहे. क्रोधाने बरबटला आहे. मग, त्याला या नामाची गती कशी मिळणार? जो मानव अहंकाराने बरबटला, मी पणाच्या पाठीमागे गेला, तो या तत्त्वात रममाण होऊ शकतो का आणि होणार आहे का? यावर याची श्रद्धा बसणार नाही.

मानवाला आजकाल चमत्कार पाहिजे. चमत्कार झाला तर या ठिकाणी देव आहे असे तो मानतो. अशा तऱ्हेने मायेच्या पंजात सापडलेला मानव, हा तत्वाच्या ठिकाणी रममाण होणे दुरापास्त आहे. यालाच निवृत्तीने “अनंत देव आपण”, अनंत आपण म्हटलेले आहे.

अवतार धारणा कशासाठी करावी लागते? याचे ज्याला वर्म सापडले आहे, तो पूर्णात पूर्ण मिलन आहे. सर्व ठिकाणी व्यापक असूनही अलिप्त आहे याची खूण सत पुरुषांना सापडली. एकच चैतन्य रोमारोमात भरले आहे अशी सत् पुरुषांची खात्री झालेली आहे. मानवांना पटणार नाही म्हणून संतांनी सांगितले, योगीयांची खूण योगी जाणे ! हे अनगडांना पटणार नाही. त्यांच्या डोक्यात भरविण्यास पुष्कळ त्रास पडेल. आसना सानिध्यात ज्योती येणार आहेत. मग या आसनाची महती सेवेकरी चाखतील. याची देही याची डोळा पाहावयास मिळेल. पण सेवेकरी दृढतेने राहावयास हवेत. ज्यांना शरण आहात, त्यांच्यातच लिन होण्याचा प्रयत्न करा. तेच सेवेकऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page