Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

नाम हे अनंत रूपाने नटले आहे ©️

नाम हे अनंत रूपाने नटले आहे ©️

श्री समर्थ मालिक – हल्लीचा मानव कोठे भटकतो, त्याची मोजदाद नाही. जो अमृताहुनी गोड पदाला मिळाला, ज्याने रस चाखला, तो यात रममाण झाल्याशिवाय केव्हाही राहणार नाही. ज्याला रममाण करावयाचे त्यालाच रममाण केले जाते. ज्याला याची गोडी नाही, त्याला कदापिही घेणार नाही. गोडी लागू देणार नाही. जे सानिध्यात आहेत, ज्यांना एक तत्व पटले त्यांनी कोणीही हे विसरू नये. जो विसरला त्याचा तो अभागी होय. म्हणून अशा तत्त्वाला राम म्हणा, गोविंद म्हणा, काहीही म्हणा, नाम हे अनंत रूपाने नटले आहे.

मी अनंत रूपाने नटून पृथ्वीची उलथा पालथ करीत असतो. जडत्व नटविल्याशिवाय मला आत स्थान घेता येत नाही. जडत्व वेगळे आहे. मी मात्र वेगळा आहे. जडत्व कशासाठी नटविले आहे? मायेचे चंचलत्व पाहण्यासाठी अनेक तऱ्हेचे कर्तव्य करण्यासाठी ही धारणा करावी लागते. प्रकृती नटवावी लागते. अशा प्रमाणे सत् सानिध्य मिळत मिळत मानव जन्म देऊन सत कर्तव्याची फेड केली जाते, पण मानवांना याची गती नसते. म्हणून या ठिकाणी मानव आहेत, त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण प्रगट रूपाने केले आहे. घेईल तो भला, नाही घेईल तो पण भला ! (समाप्त) ©️

You cannot copy content of this page